राज्यात दि.22 जुलै ते 22 ऑगस्ट या कालावधीत “मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” मोहिमेचे आयोजन
ठाणे,दि.21(जिमाका):- महाराष्ट्र शासनातर्फे दि.22 जुलै 2025 ते 22 ऑगस्ट 2025 या कालावधीत राज्यभर “मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र” या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोहिमेदरम्यान शासकीय, NGO व खाजगी व्यावसायिक यांच्यामार्फत राज्यात एक लक्ष मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे.
त्या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी मोतीबिंदू सर्वेक्षण शिबिरे व शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होवून नजीकच्या शासकीय रुग्णालयात लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment