जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते कल्याण येथे शाळा व शासकीय रुग्णालयांना संगणक व टॅबचे वाटप
ठाणे,दि.22(जिमाका):- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कल्याण उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात आय.डी.बी.आय. बँक लिमिटेड यांच्या सी.एस.आर. निधीतून कल्याण तालुक्यातील काही शाळांना व शासकीय रुग्णालयांना संगणक, प्रिंटर्स व टॅब्सचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. कल्याण उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या केलेल्या नुतनीकरणाची पाहणी करुन त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच कार्यालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करुन निरंतरपणे लोकहितार्थ सेवा देण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण देखील करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर, आय.डी.बी.आय. बँकेचे मुख्य व्यवस्थापक रंजनकुमार रथ, ठाणे विभाग व्यवस्थापक रंजन कन्हैया तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांनी कल्याण तहसिल कार्यालयादेखील भेट दिली.
00000

Comments
Post a Comment