लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
ठाणे,दि.23(जिमाका):- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच त्यांच्यासह तहसिलदार (सर्वसाधारण) सचिन चौधर यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी अव्वल कारकून सुमेध राऊत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
00000

Comments
Post a Comment