उद्योग विभागांतर्गत “मैत्री सेल”च्या माध्यमातून उद्योग सुरू करण्याबाबत मिळणार मोफत मार्गदर्शन


ठाणे,दि.28(जिमाका):- महाराष्ट्रामध्ये एखादा उद्योग कसा सुरु करावा, उद्योग सुरू करण्याकरिता लागणारे लायसन्स, परवाने, ना हरकत प्रमाणपत्र, इत्यादी बाबतची माहिती तसेच वेगवेगळ्या उद्योग स्थापनेमध्ये व चालविण्यामध्ये शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती, अस्तित्वात असलेल्या उद्योगधंद्याबाबतच्या शासनाशी निगडित समस्या, महाराष्ट्रातून विविध उत्पादनाचे विदेशामध्ये एक्सपोर्ट कसे करावे, एक्सपोर्ट करण्याकरिता शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती इत्यादीवर मार्गदर्शन करण्याकरिता उद्योग विभागांतर्गत मैत्री सेलच्या १८००-२३३-२०३३ या टोल फ्री क्रमांकाद्वारे मोफत माहिती देण्याची सुविधा सुरू आहे. या टोल फ्री क्रमाकांसोबतच कार्यालयीन ०२२-२२६२२३२२२२६२२३६१ या दूरध्वनी क्रमांकावरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तरी अधिकाधिक उद्योजकांनी उद्योगाविषयी माहिती मिळविण्याकरिता उद्योग विभागाच्या या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ