कोपरखैरणे येथील शेतकरी समाज हॉलमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न
ठाणे,दि.23(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व उत्कर्ष ग्रामस्थ मंडळ, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दि.22 जुलै 2025 रोजी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, याकरिता शेतकरी समाज हॉल, सेक्टर 4-अ, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण 21 उद्योजकांनी सहभाग घेतला असून एकुण 510 उमेदवारांनी मुलाखती दिल्या व त्यामध्ये एकूण 139 उमेदवारांची प्राथमिक व 14 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी लोकसभा सदस्य संजय नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अभिषेक पवार, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मुंबई विभागाचे उपायुक्त सचिन जाधव, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त संध्या साळुंखे, राजेश पाटील, जिल्हा समन्वयक शुभम शिंदे, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, मुख्याध्यापिका श्रीमती भाग्यश्री चौधरी, समाजसेवक कृष्णा पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमित ढोमसे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताजी घंगाळे यांनी केले.
00000
Comments
Post a Comment