कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करण्यासाठी प्रस्ताव सादर करावे
ठाणे,दि.22(जिमाका):- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 अंतर्गत जिल्हास्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांचा होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्थानिक समिती कार्यरत असते.
शासन निर्णय क्र.मकची-2014/ प्र.क्र.63/ मकक दि.11 सप्टेंबर, 2014 अन्वये जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करण्यासाठी अध्यक्ष व सदस्य पदासाठी खालीलप्रमाणे अनुभव असलेल्या व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
अ) अध्यक्ष- सामाजिक कार्याचा 5 वर्षाचा अनुभव असलेली महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेली माहिला.
ब) दोन सदस्य- महिलांच्या सोयीसाठी बांधिल असलेल्या अशा अशासकीय संघटना / संघ किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचीत असलेली व्यक्ती, त्यांच्या पैकी किमान एक सदस्य महिला असावी.
1. त्यापैकी कायद्याची पार्श्वभूमी असलेली व्यक्ती.
2. तसेच अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती किंवा इतर मागास वर्ग किंवा अल्प संख्यांक समाजातील महिला.
अर्जदार ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असावा तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अपहार / गुन्हा दाखल नसावा, अर्जदार यांचे अलीकडील काळातील पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्र, वैयक्तिक परिचय पत्र व इतर आवश्यक कागदपत्रासह अध्यक्ष व सदस्यांसाठी परिपूर्ण प्रस्ताव दि.29 जुलै 2025 रोजी पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नियोजन भवन, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे पश्चिम-400601 येथे सादर करावेत, असे आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment