सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न
ठाणे,दि.23(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.22 जुलै 2025 रोजी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात याकरीता सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण 20 उद्योजकांनी सहभाग घेतला तर एकूण 220 उमेदवारांनी मुलाखती दिल्या व त्यामध्ये एकूण 48 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस उपायुक्त झोन-5 प्रशांत कदम, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश भगुरे, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक ॲड. संदीप लेले, माजी नगरसेवक श्रीमती मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक भरत चौहान, प्रशांत जाधव, लाईट हाऊस कॉम्युनिटीज फाऊंडेशन, ठाणे केंद्रप्रमुख अविनाश पवार व ठाणे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रविंद्र सुरवसे उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment