डोंबिवली येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न
ठाणे,दि.23(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.22 जुलै 2025 रोजी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात याकरिता महावीर हाईट्स, वीर सावरकर रोड, डोंबिवली (पू.) येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (प्लेसमेंट ड्राईव्ह) आयोजन करण्यात आले होते.
या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण 10 उद्योजकांनी सहभाग घेतला असून यामध्ये 60 उमेदवारांनी मुलाखती दिल्या व त्यामध्ये एकूण 48 उमेदवारांची प्राथमिक व 7 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या कल्पना पाटील, लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन केंद्र प्रमुख शेफाली शिरसेकर उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment