विधानसभा अर्जदार उमेदवार राजन विचारे व केदार दिघे यांच्या मागणीनुसार ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशिन्सच्या Burnt memory/microcontroller ची तपासणी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण


ठाणे,दि.22(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्त दि.17 जून 2025 च्या पत्र व त्यासोबतच्या SOP नुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मधील ठाणे जिल्ह्यातील 147-कोपरी पाचपाखाडी व 148-ठाणे या विधानसभा मतदारसंघातील अर्जदार उमेदवार श्री.राजन विचारे व श्री.केदार दिघे यांनी केलेल्या मागणीनुसार केंद्र क्रमांक अनुक्रमे 305 व 68 मधील ईव्हीएम व्हीव्हीपॅटच्या Burnt memory/microcontroller च्या तपासणी व पडताळणीची प्रक्रिया दि.19 जुलै 2025 रोजी केंद्रीय वखार महामंडळ, तुर्भे, नवी मुंबई येथे करण्यात आली आहे.

भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार व विहित कार्यपध्दतीनुसार (SOP) अर्जदार उमेदवार यांनी ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनच्या Burnt memory/microcontroller तपासणीच्या अनुषंगाने उपलब्ध असलेले 1. Diagnostic Checking व 2. Mock Poll या पर्यायापैकी Diagnostic Checking करण्याबाबतचा पर्याय निवडला.

भारत निवडणूक आयोग यांच्याकडील कार्यपध्दतीनुसार (SOP) Diagnostic Checking या पर्यायानुसार अर्जदाराने निवड केलेल्या मतदान केंद्रावरील प्रत्यक्ष वापरण्यात आलेली BU, CU व VVPAT यांची जोडणी करण्यात येते. जोडणी केल्यानंतर ही मशीन Self Diagnostic Check करून त्याबाबत VVPAT मध्ये 7 स्लिप्स प्रिंट होतात. या कार्यवाही दरम्यान अर्जदार उमेदवारास किंवा त्यांच्या प्रतिनिधीस या मशीनमध्ये मतदान केंद्रावरील झालेले केवळ एकूण मतदान दाखविण्यात येते.

भारत निवडणूक आयोग यांच्याकडील कार्यपध्दतीनुसार (SOP) Mock Poll हा पर्याय निवडल्यास अर्जदाराने निवड केलेल्या मतदान केंद्रावरील CU मधील संपूर्ण निकाल अर्जदार उमेदवार/प्रतिनिधी यांना दाखविण्यात येतो. त्याची नोंद विहित नमुन्यात करण्यात येवून त्यावर उपस्थित अर्जदार उमेदवार/प्रतिनिधी यांची स्वाक्षरी घेण्यात येते. त्यानंतर CU मधील संपूर्ण डेटा Erase करण्यात येवून BU, CU व VVPAT यांची जोडणी करण्यात येते. त्यानंतर Mock Poll ची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. या Mock Poll मध्ये किमान 500 मतदान करण्यात येते. त्यानंतर या Mock Poll चा निकाल अर्जदार उमेदवार/प्रतिनिधी यांना पुन्हा दाखविण्यात येतो व त्याची नोंद घेवून उपस्थित अर्जदार उमेदवार/प्रतिनिधी यांच्या स्वाक्षरी घेण्यात येतात.

147-कोपरी पाचपाखाडी व 148-ठाणे या विधानसभा मतदारसंघातील अर्जदार उमेदवारांनी Diagnostic Checking हा पर्याय निवडल्यामुळे भारत निवडणूक आयोगाकडील विहित कार्यपध्दतीनुसार मशीनमधील एकूण झालेले मतदान दाखविण्यात आले असून ते बरोबर असल्याचे दिसून आले. ही प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या भारत ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या अभियंत्याद्वारे पूर्ण करण्यात आली.

ही तपासणी प्रक्रिया अर्जदार उमेदवार / प्रतिनिधी, जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.अशोक शिनगारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली असून 147-कोपरी पाचपाखाडी व 148-ठाणे या विधानसभा मतदारसंघातील अनुक्रमे मतदान केंद्र क्रमांक 305 व 68 मधील EVM-VVPAT मशीन Diagnostic Tests Pass झाल्या आहेत.

148-ठाणे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 68 च्या मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदानाच्या दिवशी मतदान संपल्यानंतर VVPAT मधील बॅटरी न काढल्याचे Diagnostic Checking करताना दिसून आले.

उपस्थित अर्जदार उमेदवार / प्रतिनिधी यांच्या शंकाचे निरसन भारत ईलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या नियुक्त अभियंत्यांनी केले असून ही प्रक्रिया समाधानकारकरित्या पूर्ण झाल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”