कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फ़त जागतिक कौशल्य स्पर्धा 2026 चे आयोजन
ठाणे,दि.25(जिमाका):- कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जागतिक
कौशल्य स्पर्धा 2026 शांघाई येथे आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 50
क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि.1 जानेवारी, 2004 किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे तसेच, Digital Construction, Cloud
Computing, Cyber Security, ICT Network Infrastructure, Additive Manufacturing,
Industrial Design Technology. Industry ८.०,
Mechatronics, Optoelectronic Technology. Robot Systems Integration, Water
Technology, Dental Prosthetics, Aircraft Maintenance या क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी, 2001 किंवा तदनंतरचा असणे अनिवार्य आहे.
तरी
ठाणे जिल्ह्यातील या स्पर्धेकरिता इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in
या लिंकवर भेट देवून दि.30 सप्टेंबर 2025
पर्यंत जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी, असे
आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त
संध्या साळुंखे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment