जिल्ह्यातील खेळाडूंना दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ
ठाणे,दि.28(जिमाका):-
ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंसाठी दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासन सदैव प्रयत्नशील
आहे असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयातील समिती सभागृहात आयोजित
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या
सन्मान प्रसंगी काढले.
यावेळी
जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, पुरस्कार
प्राप्त खेळाडू व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
यावेळी
जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले की, खेळाडूंना
प्रोत्साहन देण्यात यावे. जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ज्या प्रकारच्या सोयी सुविधा
उपलब्ध आहेत त्यामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. खेळाडूंचा कल पाहून त्यांना सर्व
प्रकारच्या सोयी सुविधा पुरविण्यात येतील. जिल्ह्यातील खेळाडूं बरोबर संवाद
साधण्यासाठी एक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये उल्लेखनीय कामगिरी
केलेल्या खेळाडूंची नोंदणी करावी. ग्रामीण भागातील तालुका क्रीडा संकुलामध्ये सर्व
सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. खेळाडूंना शासकीय सेवेत सुध्दा प्राधान्य
देण्यात येते.
यावेळी
जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा
सन्मान करण्यात आला.
श्री.पवन
मुकुंद भोईर (जिम्नॅस्टिक्स), श्रीमती
संयुक्त प्रसेन काळे (रिदमिक जिम्नॅस्टिक्स), श्री.आर्यन
भालचंद्र जोशी (बुध्दीबळ),
श्री.धर्मेंद्रकुमार यादव (पॉवर
लिफ्टिंग), श्री.उदय उमेश उतेकर (जलतरण वॉटरपोलो), श्रीमती अपूर्वा महेश पाटील (ज्युदो), श्री.अजित कारभारी, कुमारी
शौर्या आंबुरे (मैदानी खेळ-हर्डल्स), श्री.शरद
कुलकर्णी जेष्ठ गिर्यारोहक यांचा जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते
शाल, ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी
पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त केले.
00000

Comments
Post a Comment