ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी 'अधिस्वीकृती पत्रिका' मिळविण्याची संधी; जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन
ठाणे, दि.28(जिमाका): श्रमजीवी, स्वतंत्र व्यवसायिक पत्रकार तसेच दैनिक
व साप्ताहिक वृत्तपत्रांच्या संपादकांनी अधिस्वीकृती पत्रिका मिळविण्यासाठी 5 सप्टेंबर 2025
पूर्वी अर्ज करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाने केले आहे.
येत्या
13 आणि 14
सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीच्या अनुषंगाने, कोकण विभागाची पूर्वतयारी बैठक 8 सप्टेंबर, 2025 रोजी पालघर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नवीन अर्जांवर
निर्णय घेतला जाणार आहे.
तरी
ठाणे जिल्ह्यातील इच्छुक व पात्र पत्रकार आणि संपादकांनी तातडीने जिल्हा माहिती
कार्यालयाशी संपर्क साधावा आणि त्यांचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह दि.5 सप्टेंबर 2025
पूर्वी अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे
आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी केले आहे.
00000
.jpg)
Comments
Post a Comment