रुग्णवाहिका चालक-मालकांनी रुग्णवाहिकेचे दरपत्रक रुग्णवाहिकांच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे बंधनकारक

ठाणे,दि.26 (जिमाका):- मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या दि. 19 जून 2020 रोजीच्या बैठकीमध्ये ठराव क्रमांक 18/2020 अन्वये रुग्णवाहिकेचे दर निश्चित करण्यात आले आहेत. या निर्णयातील अट क्रमांक 03 नुसार रुग्णवाहिकांचे दरपत्रक सर्व रुग्णवाहिकांच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे चालक व मालक यांना बंधनकारक करण्यात आले आहे.

वाहनाचा प्रकार - मारुती व्हॅन - 25 कि.मी. अथवा 2 तासांकरिता 700 रु., 25 कि.मी. अथवा 2 तासांनंतर लागू होणारे भाडेदर प्रति कि.मी. - 14 रु. वाहनाचा प्रकार - टाटा सुमो व मॅटॅडोर सदृश्य कंपनीने बांधणी केलेले वाहने - 25 कि.मी. अथवा 2 तासांकरिता - 840 रु., 25 कि.मी. अथवा 2 तासांनंतर लागू होणारे भाडेदर प्रति कि.मी. - 14 रु., वाहनाचा प्रकार - टाटा 407 स्वराज माझ्दा आदींच्या साच्यावर बांधणी केलेली वाहने - 25 कि.मी. अथवा 2 तासांकरिता- 980 रु., 25 कि.मी. अथवा 2 तासांनंतर लागू होणारे भाडेदर प्रति कि.मी. 20 रु., वाहनाचा प्रकार - आय.सी.यू. अथवा वातानुकुलित वाहने - 25 कि.मी. अथवा 2 तासांकरिता- 1190 रु., 25 कि.मी. अथवा 2 तासांनंतर लागू होणारे भाडेदर प्रति कि.मी.- 24 रु.

अटी व शर्ती:-

1. वरील भाडेदर हे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रासाठी असून हे भाडेदर रुग्ण ॲम्ब्युलन्समध्ये बसल्यापासून संबंधीत हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्याच्या व परतीच्या अंतरासाठी आहेत.

2. 25 कि.मी. पुढे अंतर गेल्यास प्रति कि.मी. भाडे व त्या मूळ भाडयात वाढवून एकूण भाडे ठरेल.

3. हे दरपत्रक सर्व रुग्णवाहिकांच्या आतील बाजूस प्रदर्शित करणे चालक व मालक यांना बंधनकारक करण्यात यावे.

4. पहिल्या एक तासाच्या प्रतिक्षा कालावधीसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

5. पहिल्या तासानंतर प्रत्येक प्रतिक्षा तास 50 रुपये प्रति तास भाडे लागेल.

6. वर दर्शविलेल्या भाडयापेक्षा कमी अथवा मोफत सेवा देता येऊ शकेल. परंतु निश्चित केलेल्या भाडयापेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही.

7. वरील 25 कि.मी. च्या वर अंतर मोजताना जास्तीचे अंतरसुध्दा विचारात घ्यावे लागेल.

हे दर मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या सर्व क्षेत्रास लागू राहतील. काही रुग्णवाहिकेमध्ये ही बाब अंमलबजावणी होत असल्याचे आढळून येत नाही. तरी सर्व रुग्णवाहिका चालक व मालकांनी मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची बैठक दि.19 जून 2020 मधील ठराव क्रमांक 18/2020 निर्णयातील अट क्रमांक 03 नुसार दरपत्रक सर्व रुग्णवाहिकांच्या आतील बाजूस प्रदर्शित करण्यात यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ठाणे रोहित काटकर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”