ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द
ठाणे,दि.22(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडील दि.12 जून 2025 रोजीच्या आदेशान्वये, राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूक - 2025-26 करिता प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित केलेला आहे.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने, ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ या पाच पंचायत समितीचे आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे / जिल्हा परिषद कार्यालय, ठाणे / तहसीलदार कार्यालय शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ तसेच गट विकास अधिकारी, पंचायत समिती शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ यांच्या कार्यालयाचे सूचना फलक तसेच जिल्ह्याच्या संकेतस्थळावर दि.22 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
00000
.jpg)
Comments
Post a Comment