समाज कल्याण कार्यालयाकडून 1 ऑक्टोबर रोजी साजरा होणार जागतिक जेष्ठ नागरिक दिवस
ठाणे,दि.30(जिमाका) : भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वावरील अनुच्छेद 39 क व 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे. ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, समाजामध्ये, त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक / मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण दि.9 जुलै, 2018 च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहे. या शासन निर्णयातील तरतूदीनुसार, 1 ऑक्टोबर हा दिवस राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस (International Day of Older Person) साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्यानुषंगाने जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त 1 ऑक्टोबर 2025 रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 4 था मजला, स्वामी समर्थ मठासमोर, खारीगांव, कळवा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास जेष्ठ नागरिकांनी उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची वेळ सकाळी 10.00 ते सायं. 5.30 पर्यंत आहे.
तरी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी ठाणे जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे, 4 था मजला, सामाजिक न्याय भवन, दत्तवाडी, स्वामी समर्थ मठासमोर, कळवा, ठाणे 400605 या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे समाज कल्याण ठाणे सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment