रब्बी 2025-26 हंगामासाठी अन्नधान्य पिके, वाणिज्यिक पिके व तेलबिया अंतर्गत पीक प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकरी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे,दि.03(जिमाका):- राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान- अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत रब्बी हंगाम 2025-26 मध्ये गहू, कडधान्य, पौष्टिक तृणधान्य, ऊस, करडई, मोहरी व सूर्यफुल या पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

पीक प्रात्यक्षिकांकरिता कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे दि.31 मार्च, 2024 पूर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांना लाभ देण्यात येणार आहे. याकरिता गटाने प्राधिकृत केलेल्या सदस्याने महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा दि.02 सप्टेंबर 2025 पासून उपलब्ध आहे. गटांची निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येणार आहे. महाडिबीटी पोर्टलवर अर्ज सादर करतांना https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते या टाईल अंतर्गत शेतकरी गटांना अर्ज करता येतील. शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार अर्ज करणाऱ्या व लाभ घेणाऱ्या गट सदस्यांचा Farmer ID असणे आवश्यक आहे.

तरी जास्तीत जास्त शेतकरी गटांनी विविध पीकांच्या पीक प्रात्यक्षिके या घटकासाठी अर्ज करावेत व लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”