इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे येथे 31 ऑगस्ट भटके विमुक्त दिवस साजरा


ठाणे,दि.01(जिमाका) :- इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे येथे 31 ऑगस्ट 2025 रोजी पहिला भटके विमुक्त दिन साजरा करण्यात आला.

महामानवांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी व कर्मचारी, समाज कल्याण ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, महामंडळ अधिकारी कर्मचारी तसेच विविध योजनांचे लाभार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे अंतर्गत असलेल्या आश्रमशाळांवर विद्यार्थी फेरी, रांगोळी स्पर्धा, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले, असे इतर मागास बहुजन कल्याण, ठाणे, सहायक संचालक यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”