महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अध्यक्षपदी नितीन काळे तर सरचिटणीसपदी समीर भाटकर व कोषाध्यक्षपदी संतोष ममदापुरे यांची निवड!


ठाणे,दि.04(जिमाका):- महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दि.23 व 24 ऑगस्ट 2025 दरम्यान संपन्न झाली. या त्रैवार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वर्ष 2025-28 या वर्षासाठी झालेल्या महासंघ पदाधिकाऱ्यांची निवडणूकीत सहकार विभागातील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई श्री.नितीन काळे यांची अध्यक्ष; वित्त व लेखा विभागातील सहायक संचालक श्री.समीर भाटकर यांची सरचिटणीस; मंत्रालयातील अवर सचिव श्री.संतोष ममदापुरे यांची कोषाध्यक्ष पदावर तसेच 12 उपाध्यक्ष; 3 महिला उपाध्यक्ष; 19 विभागीय सहचिटणीस; 19 महिला सहचिटणीस यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्यातील विविध खात्यांतील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या 70 खातेनिहाय संघटनांची शिखर संघटना आहे. महासंघामार्फत राज्यसेवेतील राजपत्रित अधिकाऱ्यांचे समान प्रश्न, शासन-प्रशासनाशी चर्चाविनिमय व सौहार्दाच्या वातावरणात सोडविले जातात. दर तीन वर्षांनी महासंघाच्या कार्यकारिणीची निवड नियमितपणे केली जाते.

शेगाव येथे दोन दिवस चाललेल्या या त्रैवार्षिक सर्वसाधारण सभेसाठी महासंघाशी संलग्न असलेल्या राज्य शासनाच्या विविध खात्यातील अधिकारी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. विभाग / जिल्हानिहाय दौरे करून जिल्हा शाखांची बांधणी करून, राज्य कार्यकारिणीची अन्य रिक्त पदे तसेच राज्य संघटन सल्लागार, संघटन सचिव, महिला संघटन सचिव, जनसंवाद सचिव आदि पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत.

सर्वप्रथम महासंघाचे संस्थापक तथा मुख्य सल्लागार दिवंगत ग.दि.कुलथे यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करुन त्रैवार्षिक सर्वसाधारण सभेच्या पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर अध्यक्ष श्री.विनोद देसाई यांनी मागील तीन वर्षांच्या कालावधीतील महासंघाच्या कार्याचा गोषवारा सादर करून, प्रलंबित राहिलेल्या वैधानिक मागण्यांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत उहापोह देखील केला.

सरचिटणीस श्री.समीर भाटकर यांनी कार्यकारिणीचा त्रैवार्षिक अहवालाचे वाचन केले. राज्यसेवेतील अधिकाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न; महासंघ कल्याणकेंद्र बांधकामाची सद्यःस्थिती; जिल्हा / खातेनिहाय सभा; अडीअडचणी तसेच संघटनात्मक कार्याचा आढावा व पुढील वाटचालीबाबत चर्चाविनिमय करण्यात आला.

स्व.कुलथे साहेबांच्या आठवणींना उजाळा देतानाच, विरहाचे दु:ख बाजूला सारुन  त्यांचा आदर्श व प्रेरणा घेवून अधिकारी महासंघाच्या कार्याला एकजुटीने गती देण्याचा आणि महासंघाला यशाच्या शिखरावर नेण्याचा संकल्प देखील उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.

सर्वांना जुनी पेन्शन योजना; महिला कर्मचाऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे 2 वर्षांची बालसंगोपन रजा; केंद्राप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे; सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील एस-20 (रु. 5400/-) च्या ग्रेड पे ची मुदत शिथिल करणे; विविध संवर्गातील प्रलंबित वेतनत्रुटी दूर करणे तसेच अन्य समान प्रश्नांच्या सोडवणूक करण्यासाठी नुतन कार्यकारिणी कटिबद्ध व आग्रही राहणार असून दिवंगत कुलथे साहेबांचे स्वप्न असलेल्या कल्याणकेंद्राची उभारणी करण्याचा दृढनिश्चय नवनियुक्त कार्यकारणीकडून याप्रसंगी करण्यात आला.

अधिकारी महासंघाचे वर्ष 2025-28 साठी नवनियुक्त पदाधिकारी

अध्यक्ष:- श्री.नितीन काळे (जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई शहर)

सरचिटणीस:- श्री.समीर भाटकर (सहाय्यक संचालक (ले. व को.), रोह्यो, नियोजन)

कोषाध्यक्ष:- श्री.संतोष ममदापुरे (अपर सचिव, कृषि मंत्रालय, मंत्रालय)

उपाध्यक्ष:-

बृहन्मुंबई: डॉ.श्रीकांत तोडकर (पशुधन विकास अधिकारी तथा वि.का.अ., मंत्रालय); श्री.प्रदीप शर्मा (सहाय्यक आयुक्त, माझगांव, मुंबई); श्री.प्रदिप रणपिसे (राजस्व सहाय्यक आयुक्त, रायगड (2) नोडल, कोकणभवन)

कोकण: डॉ.संदीप माने (निवासी उपजिल्हाधिकारी, ठाणे)

कोल्हापूर: श्री.संजय शिंदे (अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर)

छत्रपती संभाजीनगर: श्री.शिरीष बनसोडे (अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना)

नाशिक: श्री.रमेश शिसव (अपर कोषागार अधिकारी, लेखा कोषा भवन, नाशिक)

अमरावती: डॉ.संदीप इंगळे (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, अमरावती)

नागपूर: श्री.कमलकिशोर फुटाणे (अपर आयुक्त (विकास), आयुक्त कार्यालय, नागपूर)

लातूर: श्री.बाळासाहेब शेलार (कार्यकारी अभियंता, ग्रामीण पा.पु.वि., जि.प. लातूर)

महिला उपाध्यक्ष:-

बृहन्मुंबई: डॉ.सोनाली कदम (सहयोगी प्राध्यापक, शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई)

सहचिटणीस:-

बृहन्मुंबई: श्री.ललीत खोब्रागडे (सहाय्यक संचालक, नगररचना, मुंबई), श्री.शेखर धोमकर (राज्यकर उपायुक्त, माझगांव, मुंबई), श्री.लक्ष्मण धुळेकर (सहाय्यक संचालक, वित्त, आयुक्तालय मत्स्यव्यवसाय, मुंबई)

कोकण: श्री.मनोज सानप (जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे), डॉ.राम मुंडे (अन्न सुरक्षा अधिकारी, ठाणे)

छत्रपती संभाजीनगर: श्री.संजयकुमार भोसले (शाखा अभियंता, जागतिक बँक प्रकल्प सा.बां.उपविभाग), श्री.रविंद्र जोगदंड (उप मु.का.अ., स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि., छ.संभाजीनगर)

नाशिक: श्री.आबासाहेब तांबे (तहसिलदार (म.), जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक), श्री.चंद्रशेखर खंबाईत (सहाय्यक अभियंता, श्रेणी-1, जलसंपदा, जळगांव)

अमरावती: श्री.कपिल नांदगांवकर (शाखा अभियंता, सा.बां.वि., अचलपूर, जि. अमरावती), श्री.यशपाल गुडधे (लेखाधिकारी, उच्च शिक्षण, अमरावती)

नागपूर: श्री.योगेश्वर निंबुळकर (शाखा अभियंता (यांत्रिकी), नागपूर), डॉ.शशिकांत मांडेकर (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, सावनेर, जि.नागपूर)

लातूर: डॉ.राजेंद्र पवार (वैद्यकीय अधिकारी, वजिराबाद, नांदेड), डॉ.प्रदीप आघाव (पशुधन विकास अधिकारी, जि.प. बीड)

महिला सहचिटणीस:-

बृहन्मुंबई: श्रीमती शिरीन लोखंडे (सहआयुक्त, कामगार, मुंबई उपनगर), श्रीमती सिध्दी संकपाळ (सहाय्यक राज्यकर आयुक्त, माझगांव, मुंबई)

कोल्हापूर: श्रीमती पूनम पाटील (शाखा अधिकारी, सा.बां.वि., कोल्हापूर), श्रीमती सुनिता नेर्लीकर (सहा. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, कोल्हापूर)

छत्रपती संभाजीनगर: श्रीमती कुसुम चव्हाण (सहाय्यक संचालक, वित्त व लेखा, छत्रपती संभाजीनगर)

नाशिक: श्रीमती सरोज जगताप (शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद नाशिक), श्रीमती सायली पाटील (कार्यकारी अभियंता, मुठा पाठबंधारे विभाग, अहिल्यानागर)

अमरावती: श्रीमती सीमा झावरे (अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अकोला), श्रीमती डॉ.क्रांती काटोले (सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन, जिल्हा परिषद, यवतमाळ)

नागपूर: श्रीमती सुवर्णा खंडेलवाल-जोशी (धर्मादाय सहआयुक्त, नागपूर), श्रीमती कुमुदिनी श्रीखंडे-हाडोळे (मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प. नागपूर)

लातूर: श्रीमती डॉ.मृणाल जाधव (तहसिलदार, धाराशिव)

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”