कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या शिबीर (कॅम्प) कार्यालयात वाढ
ठाणे,दि.04(जिमाका):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शिबीर कार्यालय 1. अंबरनाथ, 2. बदलापूर व 3. मुरबाड अशी एकूण तीन शिबीर कार्यालये येत असून या कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्ती (Learner License) व पक्के अनुज्ञप्ती (Driving License) विषयक कामकाज केले जाते.
शिबीर कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्ती (Learner License) व पक्के अनुज्ञप्ती (Driving License) बाबत अपॉईन्टमेंट मिळत नसल्याने जनतेची गैरसोय होते व लोकसंख्येतील वाढ लक्षात घेता शिबीर कार्यालये कमी पडत असून शिबीर कार्यालयात वाढ करणे आवश्यक असल्याने शिबीर कार्यालयात वाढ करण्यात आली आहे.
शिबीर कार्यालयाचे नियोजन पुढीलप्रमाणे:-
शिबीर कार्यालय क्र.1 - शिबीर कार्यालयाचे ठिकाण- अंबरनाथ, कामकाजाचे दिवस- दर महिन्याच्या प्रत्येक मंगळवार व शुक्रवारी.
शिबीर कार्यालय क्र.2 - शिबीर कार्यालयाचे ठिकाण- बदलापूर, कामकाजाचे दिवस- दर महिन्याच्या प्रत्येक सोमवार व गुरुवारी.
शिबीर कार्यालय क्र.3 - शिबीर कार्यालयाचे ठिकाण- मुरबाड, कामकाजाचे दिवस- दर महिन्याच्या प्रत्येक बुधवारी.
जनतेचे हिताकरिता शिबीर कार्यालयात वाढ करण्यात आल्याचे कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment