नागरिकांना त्यांच्या तक्रारी/अडीअडचणी सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर

 

ठाणे,दि.01(जिमाका) :-  ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना व्हॉट्सॲप व्दारे जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांच्याकडे तक्रारी/अडीअडचणी सादर करण्यासाठी 9930001185 हा व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात येत आहे.

या क्रमांकावर व्हॉट्सअॅप (Whatsapp) द्वारे तक्रार नोंदविताना, तक्रार ज्या विभागाची आहे त्या विभागाचे नाव व्यवस्थित नमूद करावे तसेच तक्रारदाराने स्वतःचे पूर्ण नाव, निवासाचा पत्ता, ई-मेल व मोबाईल क्रमांकही नमूद करावा.

या व्हॉट्सअॅप (Whatsapp) वर आपल्या तक्रारीशी संबंधित नसलेले कोणत्याही प्रकारचे अनावश्यक शुभेच्छा संदेश, छायाचित्रे, व्हिडिओ वा अन्य मजकूर पाठवू नये. ही सुविधा कॉलिंगसाठी नसून केवळ मेसेजद्वारे आपली तक्रार नोंदविण्यासाठी आहे. मेसेजव्दारे प्राप्त तक्रारीची दखल घेण्यात येणार आहे.

तक्रारदाराने वारंवार एकाच स्वरुपाची तक्रार करु नये. एकाच वेळेस तक्रार पाठवावी, त्याची नोंद घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (भा.प्र.से.) यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”