जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा

ठाणे,दि.29(जिमाका) : शासन निर्णय क्र.केंमाअ-2008/प्र.क्र.378/08/सहा, दि.20 सप्टेंबर 2028  अन्वये 28 सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), श्रीमती रुपाली भालके, नायब तहसिलदार तथा जनसंपर्क अधिकारी मधुकर जाधव, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित  होते.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), श्रीमती रुपाली भालके यांनी माहितीचा अधिकार कायदा-2025 या कायद्याला 19 वर्षे पूर्ण होत असून कायद्याची महत्वाची उद्दिष्टे, बाबी, माहिती पुरविण्याची जबाबदारी, पत्रव्यवहार करताना घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती दिली.

000000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”