ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आधार संच वाटप
ठाणे,दि.25(जिमाका):- माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्याकडून ठाणे जिल्ह्यासाठी आधार संच पुरविण्यात आले आहेत. हे आधार संच मिळण्यासाठी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले होते. त्यापैकी 107 अर्जदार यांनी त्यांच्याकडे आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित असल्याचे व आपले सरकार सेवा केंद्रामधून सेवा देण्यात येत असून Transactions होत असल्याच्या निकषाची व इतर विहीत निकषांची पुर्तता केल्याने त्यांना पात्र ठरविण्यात आले आहे.
त्यापैकी प्रातिनिधिक स्वरुपात 24 केंद्र चालकांना आज अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील व उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रुपाली भालके यांच्या हस्ते व तहसिलदार सचिन चौधर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आधार संच वाटप करण्यात आले.
00000
Good Work
ReplyDelete