महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमता चाचणी (TAIT) परीक्षा 2025
ठाणे,दि.03(जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संकीर्ण 2025/प्र.क्र.92/टिएनटी-1, दि. 28 फेब्रुवारी 2025 व मा. आयुक्त (शिक्षण), यांचे जा.क्र. आस्था-क/पाथ 106/टेट-3/वेप/2025/1191, दि.19 मार्च 2025 रोजीच्या पत्रान्वये तसेच सदर परीक्षा शासन निर्णय सामान्य प्रशासन प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.13-अ. दि.21 नोव्हेंबर 2022 नुसार शासनाने नेमलेल्या IBPS या संस्थेमार्फत "शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा 2025" चे आयोजन ऑनलाईन पध्दतीने दि.27मे2025ते30 मे 2025व दि.02 जून 2025 ते 05 जून 2025 या कालावधीत राज्यातील 26 जिल्ह्यांमध्ये एकूण 60 परीक्षा केंद्रांवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 8 दिवसामध्ये प्रतिदिन तीन सत्रात करण्यात आले होते. सदर परीक्षेस एकूण 2 लाख 28 हजार 808 परीक्षार्थी / उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेस एकूण 2 लाख 11 हजरी 308 प्रविष्ठ झाले होते.
या परीक्षेचा निकाल दि.18 ऑगस्ट 2025 रोजी गुणयादी व गुणपत्रक (SCORE LIST & SCORE CARD) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेचे एकूण 6 हजार 320 प्रविष्ठ (Appear) विद्यार्थी/उमेद्वारांपैकी 2 हजार 789 विद्यार्थी/उमेद्वारांचा निकाल दि.25 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे.
तथापि विद्यार्थी उमेद्वारांच्या मागणीनुसार पुनःश्च विहित नमुन्यातील गुणयादी (SCORE LIST) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www. mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे- 04 आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
000000
Comments
Post a Comment