“एल्डर लाईन” 14567– ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार

 

ठाणे,दि.16(जिमाका):- सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय,  भारत सरकारराष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने जेष्ठ नागरिकांसाठी 14567 राट्रीय हेल्पलाईन ही सेवा देशभरातील सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात वयोवृद्धांसाठी सुरू करण्यात आली आहे. जनसेवा फाउंडेशनपुणे यांच्यामार्फत ही सेवा महाराष्ट्रात राबवली जाते. मानवसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन संस्थापक अध्यक्ष डॉ.विनोद शहा (MD) यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाऊंडेशन, पुणे गेल्या 37 वर्षापासून सातत्याने आपल्या विविध प्रकल्पांद्वारे गरीबआजारीवृद्ध, अपंगनिराधारगरीब मुले मुली आणि महिला यांची सेवा करीत आहेत. जनसेवा फाउंडेशनला सयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष दर्जा प्राप्त आहे.

महाराष्ट्रातील अंमलबजावणी: ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेल्या या 14567 राष्ट्रीय टोल-फ्री हेल्पलानवर आतापर्यंत 4 लाखांहून अधिक कॉल्स आले असून 30 हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे.

हेल्पलाइनद्वारे मिळणाऱ्या मोफत प्रमुख सेवा:

•        माहिती: आरोग्यपोषणनिवाराआश्रयगृह व वृद्धाश्रमडे केअर सेंटरयाबाबत माहिती.

•        मार्गदर्शन: कायदेविषयकमालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्लापेन्शन योजनाज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम 2007.

•        भावनिक आधार  मानसिक आजार व चिंताताणराग इत्यादी व्यवस्थापन.

•        बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत आणि पुनर्वसनकुटुंबीयांशी संवादपोलिस प्रशासनाशी समन्वयसमुपदेशन.

एल्डर लाईन 14567 ही केवळ हेल्पलाईन नाही तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हातएक सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वयोवृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता येईल यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. ज्येष्ठांसाठीची ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी समाजातील प्रत्येकाने जागरूक व्हावे आणि सर्व गरजू वयोवृद्धांनी या एल्डर लाईनचा लाभ घ्यावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”