सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आयोजित “रन फॉर युनिटी” कार्यक्रमात सहभागी व्हावे
ठाणे,दि.29(जिमाका):- सरदार वल्लभभाई पटेल यांची 150 वी जयंती दि.31 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने दि.31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 06:30 वाजता “रन फॉर युनिटी” हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज मैदान, तलावपाळी, ठाणे येथून सुरू करण्यात येवून पुन्हा त्याच ठिकाणी समाप्त करण्यात येणार आहे.
“रन फॉर युनिटी” कार्यक्रम ठाणे पोलीस आयुक्तालय व ठाणे शहरातील नागरिकांच्या संयुक्त सहभागाने राबविण्यात येणार असल्याने या कार्यक्रमामध्ये ठाणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने केले आहे.
00000
Comments
Post a Comment