जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ कार्यक्रम
ठाणे,दि.29(जिमाका):- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे “सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 निधी संकलन शुभारंभ” कार्यक्रम मंगळवार दि.09 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील इतर मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा शुभारंभ उपस्थितांना ध्वज लावून व ध्वजदिन निधी स्विकारून करण्याचे निश्चित झाले आहे.
या राष्ट्रीय कार्यक्रमास मंगळवार, दि.09 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.45 वाजता उपस्थित राहावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ठाणे/पालघर मेजर प्रांजल जाधव (निवृत्त) यांनी कळविले आहे.
00000

Comments
Post a Comment