“भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार” योजनेचे अर्ज करण्यासाठी दि.30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत

ठाणे,दि.29(जिमाका):- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेशास पात्र असून शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी रक्कम संबंधीत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे.

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर भरण्यासाठी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत दि.30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहेत. याल योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज दि. दि.30 नोव्हेंबर 2025 या मुदतीच्या अगोदर सादर करावेत, तसेच अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट सर्व कागदपत्रांसह सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन, 4 था मजला, दत्तवाडी, खारेगाव, कळवा, जि.ठाणे., 400605 या कार्यालयास जमा करावी, असे ठाणे समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”