विशेष लेख क्र.41: जिल्हास्तर युवा महोत्सव 2025-26; युवा शक्तीला मिळणार व्यासपीठ
वक्तृत्व, लोककला आणि नवोपक्रम स्पर्धांचे आयोजन
राज्यातील युवकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत सन 1994 या वर्षीपासून दरवर्षी दि.12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
देशातील संस्कृती व परंपरा जतन करून या संस्कृतीचे संवर्धन करणारा प्रातिनिधीक युवा संघ वरील राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होतो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे या कार्यालयाद्वारे युवा दिन, युवा सप्ताह व युवा महोत्सव निमित्ताने युवांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय, राज्य, विभाग व जिल्हास्तरावर करण्यात येते.
त्यानुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे जिल्ह्यात युवा महोत्सव आयोजनाबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत. ज्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत कविता लेखन, नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) या बाबींचा समावेश आहे. जिल्हास्तरावरील विजेत्यांना प्रावीण्य प्रमाणपत्र/बक्षीस रक्कम दिली जाईल. प्रावीण्य प्राप्त प्रथम व व्दितीय विजेते संघ पुढील विभाग व राज्यस्तरीय कार्यक्रमात भाग घेतील.
युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या दि.27 ऑगस्ट 2025 च्या पत्रान्वये राष्ट्रीय युवा महोत्सवाचे रुपांतर VBYLD मध्ये करण्यात आले असून तो विकसित भारत 2047 या दृष्टीकोनाशी जोडण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर NYF-VBYLD-2026 चे आयोजन युवा कार्यक्रम व खेळमंत्रालयाकडून केले जाणार आहे, ज्यामध्ये 15 ते 29 वयोगटातील युवकांचा सहभाग अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रॅक चे आयोजन होवून स्पर्धक विभागस्तरावर सहभागी होतात, त्यातून गुणी कलावंतांची निवड होवून राज्यस्तरावरील युवा महोत्सवासाठी विभागाचा संघ पाठविला जातो, त्यानुसार या जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय युवा महोत्सव विकसित भारत चॅलेंज ट्रॅक आयोजन समिती संरचना:-
· जिल्हाधिकारी, ठाणे - अध्यक्ष, आयोजन समिती
· उपसंचालक, क्रीयुसे मुंबई - सदस्य
· जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र - सदस्य
· राष्ट्रीय सेवा योजना प्रमख संबंधित विद्यापीठ - सदस्य
· प्राचार्य शासकीय व निमशासकीय महाविद्यालय - सदस्य
· जिल्हा माहिती अधिकारी - सदस्य
· विज्ञान तंत्रज्ञान विषयक तज्ञ मान्यवर / प्राध्यापक / संस्था प्रतिनिधी 2- सदस्य
· संगीत व नृत्य तज्ञ/ विशारद / परीक्षक -3 प्रतिनिधी - सदस्य
· जिल्हा क्रीडा अधिकारी - सदस्य सचिव
स्पर्धांचे प्रकार (Cultural & Innovation Track):-
1. वक्तृत्व
2. कथालेखन
3. चित्रकला
4. लोकनृत्य (गट)
5. लोकगीत (गट)
6. कविता लेखन
7. नवोपक्रम विज्ञान प्रदर्शन
· सांस्कृतिक - लोकनृत्य गट, सहभाग संख्या - 10, केंद्र शासनाने निश्चित केल्याप्रमाणे नियम, वेळ, सहभाग संख्या नमूद आहे. लोकनृत्य व लोकगीत यामध्ये निर्धारीत संख्येमध्ये वाद्यवृंद संख्या अंतर्भूत राहील.
· सांस्कृतिक - लोकगीत गट, सहभाग संख्या - 10, केंद्र शासनाने निश्चित केल्याप्रमाणे नियम, वेळ, सहभाग संख्या नमूद आहे. लोकनृत्य व लोकगीत यामध्ये निर्धारीत संख्येमध्ये वाद्यवृंद संख्या अंतर्भूत राहील.
· कौशल्य विकास - चित्रकला, सहभाग संख्या - 3, केंद्र शासनाने निश्चित केल्याप्रमाणे नियम, वेळ, सहभाग संख्या नमूद आहे. लोकनृत्य व लोकगीत यामध्ये निर्धारीत संख्येमध्ये वाद्यवृंद संख्या अंतर्भूत राहील.
· कौशल्य विकास - वक्तृत्व, सहभाग संख्या - 2, केंद्र शासनाने निश्चित केल्याप्रमाणे नियम, वेळ, सहभाग सख्या नमूद आहे. लोकनृत्य व लोकगीत यामध्ये निर्धारीत संख्येमध्ये वाद्यवृंद संख्या अंतर्भूत राहील.
· कौशल्य विकास - कविता, सहभाग संख्या - 2, केंद्र शासनाने निश्चित केल्याप्रमाणे नियम, वेळ, सहभाग संख्या नमूद आहे. लोकनृत्य व लोकगीत यामध्ये निर्धारीत संख्येमध्ये वाद्यवृंद संख्या अंतर्भूत राहील.
· कौशल्य विकास - नवोपक्रम विज्ञान प्रदर्शन, सहभाग संख्या - 3, केंद्र शासनाने निश्चित केल्याप्रमाणे नियम, वेळ, सहभाग संख्या नमूद आहे. लोकनृत्य व लोकगीत यामध्ये निर्धारीत संख्येमध्ये वाद्यवृंद संख्या अंतर्भूत राहील.
बक्षिसांचा तपशील:
· समूह लोकनृत्य - प्रथम - 7 हजार, द्वितीय - 5 हजार, तृतीय - 3 हजार
· समूह लोकगीत - प्रथम - 5 हजार, द्वितीय - 3 हजार, तृतीय - 2 हजार 500
· कथा लेखन - प्रथम - 3 हजार, द्वितीय - 2 हजार, तृतीय - 1 हजार 500
· चित्रकला स्पर्धा - प्रथम - 3 हजार, द्वितीय - 2 हजार, तृतीय - 1 हजार 500
· वक्तृत्व - प्रथम - 3 हजार, द्वितीय - 2 हजार, तृतीय - 1 हजार 500
· कविता लेखन - प्रथम - 3 हजार, द्वितीय - 2 हजार, तृतीय - 1 हजार 500
· नवोपक्रम - विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रकल्प सादरीकरण - प्रथम - 5 हजार, द्वितीय - 3 हजार, तृतीय - 2 हजार.
जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजन समितीची बैठक संपन्न
सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून जिल्हा युवा महोत्सव यशस्वी करावा -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ
जिल्हास्तर युवा महोत्सव आयोजन करण्याकरिता जिल्हास्तर आयोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि.28 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न झाली. या बैठकीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून जिल्हा युवा महोत्सव यशस्वी करावा, जास्तीत जास्त युवक-युवतींचा सहभाग वाढेल, यासाठी प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी सूचित केले.
या बैठकीत संचालनालयाच्या परिपत्रकानुसार समिती गठन करण्यास मान्यता प्रदान करणे, जिल्हास्तर युवा महोत्सवाचे ठिकाण व तारीख निश्चित करणे, युवा महोत्सवाच्या अंदाजपत्रक व खर्चास मान्यता देणे या विषयांबाबत सविस्तर चर्चा झाली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांनी सूचित केले की, प्रतिवर्षी जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येते, जिल्हा, विभाग, राज्यस्तर स्पर्धेमधून निवडलेला चमू राष्ट्रीय युवा महोत्सवात राज्याचे प्रतिनिधीत्व करतो. युवा महोत्सवाच्या जिल्हास्तर आयोजन समितीमध्ये संचालनालयाच्या निर्देशानुसार 9 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यामध्ये पदसिद्ध सदस्यांसह आमंत्रित प्रतिनिधींची नियुक्ती करणे आवश्यक आहे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयक तज्ञ, संगीत विशारद प्रतिनिधी, नृत्य विशारद प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्याबाबत चर्चा होऊन मान्यता होणे आवश्यक आहे.
मनोज सुमन शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
ठाणे

Comments
Post a Comment