दिवाळीनिमित्त खासगी वाहतूकदारांकडून होणाऱ्या जादा भाडे आकारणीला आळा घालण्यासाठी ठाण्यात विशेष तपासणी मोहीम
ठाणे,दि.16(जिमाका):- दि.17 ऑक्टोबर 2025 पासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त प्रवासी मोठ्या प्रमाणावर गावी येत व जात असतात. खाजगी वाहतूकदाराकडून प्रवाशांकडून जादा भाडे आकारण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी व रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शासनाने विशेष तपासणी मोहिम हाती घेतली आहे.
तरी प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणींबाबत प्रवासी कार्यालयाच्या rto.04-mh@gov.in ईमेलवर आपल्या तक्रारी नोंदवू शकत आहेत. तसेच, खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी पूर्ण बससाठी आकारावयाचे भाडे याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे या कार्यालयाने दरतक्ता प्रदर्शित केला असल्याने त्या भाडे दरपत्रकानुसार प्रवाशांनी भाड्याची अदागी करावी, असे ठाणे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
00000

Comments
Post a Comment