मुख्य वनसंरक्षक (प्रा.) ठाणे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात नवीन जागेत स्थलांतर

ठाणे,दि.14(जिमाका):- ठाणे वनृत्तांतर्गत मौजे कोपरी येथे वनभवन इमारतीचे बांधकाम चालू असल्याने शासन निर्णय, महसूल व वनविभाग क्र.एफडीएम-2025/प्र.क्र.55/वने-2, दि. 23 सप्टेंबर 2025 या शासन निर्णयानुसार मुख्य वनसंरक्षक (प्रा.), ठाणे वनवृत्ताचे कार्यालय हे खाजगी जागेत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्याबाबत परवानगी मिळालेली आहे.

त्यानुसार दि.01 ऑक्टोबर 2025 पासून मुख्य वनसंरक्षक (प्रा.), ठाणे, ठाणे वनवृत्त यांचे कार्यालय, सनप्लाझा शॉपिंग सेंटर, 04 था मजला, हरि ओम नगर, मुलुंड (पूर्व), मुंबई- 400081 या ठिकाणी हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आले आहे, असे मुख्य वनसंरक्षक (प्रा.), ठाणे एन.आर.प्रवीण यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”