ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रारुप आरक्षणाची अधिसूचनेची प्रत प्रसिद्ध
ठाणे,दि.14(जिमाका):- महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम, 5) च्या तरतुदी अन्वये ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणातील एकूण सदस्य संख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच स्त्रियांकरिता (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्रियांसह) राखून ठेवण्यात आलेले निवडणूक विभाग व निर्वाचक गणाबाबत ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या क्र./ जिकाठा/ सा.शा / जिपपंस /आरक्षण /2025, दि. 14 ऑक्टोबर 2025 च्या प्रारुप आरक्षणाची अधिसूचनेची प्रत खाली दर्शविलेल्या ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली असून मसुदा ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडून त्या आदेशात नमूद केल्यानुसार दि.14 ऑक्टोबर 2025 नंतर विचारात घेण्यात येईल.
प्रारुप आरक्षणाची अधिसूचनेची प्रत 1. जिल्हाधिकारी ठाणे यांचे कार्यालयातील फलकावर, 2. जिल्हा परिषद ठाणे कार्यालयातील फलकावर, 3. तहसिलदार शहापूर / मुरबाड / कल्याण / भिवंडी / अंबरनाथ यांच्या कार्यालयातील फलकावर व 4. पंचायत समिती शहापूर / मुरबाड / कल्याण / भिवंडी / अंबरनाथ कार्यालयातील फलकावर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची जी सकारण लेखी निवेदने /हरकती/ सूचना जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे दि.17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर करावेत. या तारखेनंतर जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे आलेली निवेदने हरकती/सूचना इत्यादी विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
00000

Comments
Post a Comment