उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण येथे दुचाकी वाहन या संवर्गासाठी नवीन मालिका सुरु
ठाणे,दि.13(जिमाका):- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण येथे दुचाकी या संवर्गासाठी MH05GE ही नवीन मालिका साधारणतः दि.17 ऑक्टोबर 2025 रोजी सुरु करण्यात येणार आहे.
तरी इच्छुक वाहन मालकांनी नवीन दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक घेण्यासाठीचे अर्ज दि.13 व 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत स्विकारले जातील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment