राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेचे ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याच्या वेळापत्रकात मुदतवाढ
ठाणे,दि.14(जिमाका):- दि.28 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेचे ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर भरण्याच्या वेळापत्रकात खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे.
तपशिल:- नियमित शुल्कासह, पूर्वीची दिनांक – 12 सप्टेंबर 2025 ते 11 ऑक्टोबर 2025, सुधारित दिनांक - 12 सप्टेंबर 2025 ते 21 ऑक्टोबर 2025.
तपशिल:- विलंब शुल्कासह, पूर्वीची दिनांक - 12 ऑक्टोबर 2025 ते 21 ऑक्टोबर 2025, सुधारित दिनांक - 22 ऑक्टोबर 2025 ते 30 ऑक्टोबर 2025.
तपशिल:- अतिविलंब शुल्कासह (शाळा/संस्था जबाबदार असेल तर), पूर्वीची दिनांक - 22 ऑक्टोबर 2025 ते 30 ऑक्टोबर 2025, सुधारित दिनांक - अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे भरणे लागू राहणार नाही.
दि.30 ऑक्टोबर 2025 नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नाही, याची नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र राज्य, परीक्षा परिषद, पुणे-4 आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment