कृषी समृद्धी योजनेसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे -जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे
ठाणे,दि.16(जिमाका):- कृषी समृद्धी योजनेतंर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2025-26 अंतर्गत विविध घटकांसाठी लाभ दिला जात आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी केले आहे.
कृषी समृद्धी योजनेतंर्गत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2025-26 मध्ये राबविण्यात येत असून यामध्ये क्षेत्र विस्तार, सामूहिक शेततळे, संरक्षित शेती, फलोत्पादन यांत्रिकीकरण, मधुमक्षिका पालन व काढणीत्तोर व्यवस्थापन इ. घटक राबविण्यात येत आहेत यामध्ये सुटी फुले व कंदवर्गीय फुलांची व बहुवार्षिक मसाला पिकांची लागवड (ड्रॅगन फुट, स्ट्रॉबेरी व ॲवकाडो) जुन्या व कमी उत्पादन देणाऱ्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन, अळंबी उत्त्पादन प्रकल्प, हरितगृह, शेडनेट, प्लास्टिक आच्छादन, फळ पिकाकरिता फळांना, फळांच्या घडांना कव्हर, तण नियंत्रणक, आच्छादन सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण फलोत्पादन, फलोत्पादन यांत्रिकीकरण घटकांतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, फवारणी पंप. मधुमक्षिका पालन व मधकाढणी यंत्र फार्म गेट पॅक हाऊस शीतखोली, शीतगृह, शीतवाहन, प्राथमिक प्रक्रिया केंद्र फळ पिकवणी कक्ष व फिरते विक्री केंद्र इ. बाबींचा समावेश असून त्याकरिता 35 ते 50 टक्क्यांपर्यंत अनुदान देय आहे. वरील घटकांसाठी अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन योजनेत सहभागी होण्यासाठी mahadbt.maharashtra.gov.in/
योजनेच्या अधिक माहितीसाठी, कृषी विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.
00000

Comments
Post a Comment