संगीताच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पोहचवा -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
ठाणे दि. 21 जिमाका : संगीत हे समाजामध्ये संदेश देण्याकरीता सकारात्मक प्रभावी माध्यम असुन या माध्यमाच्या द्वारे स्वच्छतेचा संदेश पोहचणे आवश्यक असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले संस्कृती आर्ट फेस्टीवल चे संचालक तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी उपवन येथे गायक कैलास खैरे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी बोलत होते. यावेळी अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,ठाणे महापौर नरेश म्हस्के,आमदार प्रताप सरनाईक,विभागीय आयुक्त शिवाजी दौड,जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर,पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर,पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिवाजी राठोड,आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते. संगीत व गीत ऐकल्याने दैनदिंन तान तनाव कमी होते.या संगीताचा उपयोग सकारात्मक संदेश जनतेमध्ये पोहचविल्यावर जनता त्यावर सकारात्मक प्रतिसाद देते असेच स्वच्छतेचा संदेश घराघरात पोहचविण्याचे काम या संगीताच्या माध्यामातून संस्कृती आर्ट फेस्टीवल करणार आहे. देशातील गावामध्ये सुध्दा स्वच्छेचा संदेश पोहचला असून त्यामुळे कुटुबाच्या आरोग्...