धनगर समाजातील विद्यार्थांकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना


धनगर समाजातील विद्यार्थांकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना 
ठाणे दि.११ जिमाका:   समाज कल्याण विभागाच्यावतीने धनगर समाजातील विद्यार्थ्यां करिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयामधील इयत्ता १२ वी नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वस्तीगृहामध्ये  प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील (भटक्या जमाती क) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सदर योजनेंतर्गत उच्च शिक्षणासाठी भोजन भत्ता २५ हजार रुपये, निवास भत्ता १२ हजार रुपये व निर्वाह भत्ता ६ हजार रुपये असे एकूण ४३ हजार रुपये रक्कमेचा लाभ व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
          तरी या योजनेचा लाभ घेण्याकरिता इयत्ता १२वी नंतरच्या मान्यतप्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेवरच केली जाइल तसेच अभ्यासक्रमाच्या मध्यावधी प्रवेश घेतलेले विद्यार्थी देखील या योजनेस पात्र असतील.
         परंतु विद्यार्थ्याने आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक  संस्थेच्या वस्तीगृहामध्ये प्रवेश घेतलेला नसावा, तसेच विद्यार्थी हा कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा. एका विद्यार्थास जास्तीत जास्त ५ वर्षे या योजनेचा लाभ घेता येईल, तसेच त्यासाठी  विद्यार्थायचे वय २८ वर्षापेक्षा जास्त नसावे, धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्यांना  या योजनेचा लाभ प्राधान्याने देण्यात येईल, विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ६० टक्के असणे बंधनकारक आहे. तरी ठाणे जिल्ह्यातील धनगर समाजातील जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण ठाणे, बलभीम शिंदे यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन