Posts

Showing posts from May, 2021

यशस्वी मुलाखत तंत्र समुपदेशनाचे ऑनलाईल मार्गदर्शन सत्र 27 मे रोजी

ठाणे   दि.24(जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे यांचे मार्फत दि. 27 मे 2021 रोजी दुपारी 4.00 वा. नोकरी इच्छूक उमेदवारा करीता यशस्वी मुलाखत तंत्र या विषयावर समुपदेशनाचे ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सत्रास . मिलींद भोसले, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक,   आशुतोष साळी यंग प्रोफेशनल हे मार्गदर्शन करणार असुन सदर सत्र गुगल मिट वर आयोजित करण्यात येणार आहे. या मध्ये ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेण्याकरिता https://meet.google.com/rpc-cwte-bpq    या लिंकवर क्लिक करुन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती कविता ह. जावळे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे यांचेमार्फत करण्यात आले आहे. -----------  

नोकरीच्छुक उमेदवार,शासकीय योजनांच्या लाभासाठी आधार कार्ड लिंक करण्याचे आवाहन

       ठाणे दि.21( जिमाका): नोकरीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा , सुविधा ऑनलाईन पध्दतीने वेबसाईटच्या माध्यमातून देण्यात येत आहेत . राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणा ऱ्या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम   योजनेअंर्तगत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळवणे , केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणा ऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणा ऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, याकरीता उमेदवारांनी स्वत : ची माहिती अदयावत करणे आवश्यक आहे , त्यामुळे आपणास रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळण्याची संधी मिळू शकते. आपण शैक्षणिक पात्रता, पत्ता,संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरूस्ती करणे, वेगवेगळया उद्योजकांनी वेळोवेळी   अधिसूचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे या बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे.      ...

मनुष्य बळाची माहिती भरण्यासाठी कंपन्यांना 31 मे पर्यंत मुदत

    मनुष्य बळाची माहिती भरण्यासाठी कंपन्यांना 31 मे   पर्यंत मुदत       ठाणे दि.21( जिमाका): ठाणे जिल्हयातील सार्वजनिक व खाजगी   क्षेत्रातील सर्व संस्था व कंपन्यांनी   मनुष्यबळाची माहिती ( ER-I ) राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी 31 मे 2021 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.            सेवायोजन कार्यालये कायदा 1959 अन्वये रिक्त सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय , निमशासकीय तसेच खाजगी   क्षेत्रातील कायदयाअंतर्गत असणा ऱ्या आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणा ऱ्या सर्व कर्मचा ऱ्यांची पूरूष / स्त्री अशी एकूण सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहिस कायदयाच्या तरतूदीनुसार भरणे बंधनकारक आहे. मार्च 2021 अखेर संपणा ऱ्या तिमाहीची माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जुने कोषागार कार्यालय , जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे कार्यालयात चालू आहे. या संदर्भात कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य अथवा...

नुकसानग्रस्त वास्तूंची दुरुस्ती,करण्यासाठी ,आवश्यक असलेल्या वस्तुंची दुकाने 31 मे पर्यंत स्थानिक प्राधिकरण यांनी निश्चित केलेल्या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी

  नुकसानग्रस्त वास्तूंची दुरुस्ती,करण्यासाठी ,आवश्यक असलेल्या वस्तुंची दुकाने 31 मे   पर्यंत स्थानिक प्राधिकरण यांनी निश्चित केलेल्या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी     ठाणे दि.20 (जिमाका):    मार्च २०२१ पासून कोविड १९ बाधितांची   संख्या विचारात घेऊन राज्य शासनाने   दि. १३ एप्रिल २०२१ रोजीच्या "Break The Chain" आदेशान्वये दि. १४ एप्रिल २०२१ रोजी रात्री ८.०० वा. पासून दि.०१मे २०२१ रोजी सकाळी ७.०० वा. पर्यंत अनेक कठोर निर्बंध लागू केले होते. तसेच सदर आदेशांमध्ये वेळोवेळी सुधारणा व मुदतवाढ घोषित केलेली आहे. दि.१२ मे २०२१ रोजीचे आदेशानुसार सद्यस्थितीत दि.०१ जून २०२१ रोजी सकाळी ७.०० वा. पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दि. १४ मे २०२१ रोजी ठाणे जिल्हयातील अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद / शहापूर, मुरबाड नगर पंचायत व संपूर्ण ग्रामीण क्षेत्रामध्ये शासनाकडील आदेशात नमूद सर्व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी सर्व संबंधितांनी करणेबाबत आदेश निर्गमित करणेत आले आहेत.   तौक्ते चक्रीवादळामुळे उद्भवलेली आपत्तीजन्य परिस्थिती व   झालेली अतिवृष्टी, या...

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या आपत्कालीन परिस्थितीचा घेतला आढावा

Image
  जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याच्या सर्व महानगरपालिकांना सूचना ठाणे:- तोकते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी आज जिल्ह्याधिकारी कार्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन जिल्ह्यातील   आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी एमएमआर क्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाला फोन करून त्यांनी तेथील परिस्थितीबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. तोकते चक्रीवादळाचा तडाखा पश्चिम किनारपट्टीला बसल्याने मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत नाही तोपर्यंत या जिल्ह्यांना त्याचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा-भाईंदर या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, विजेचे खांब कोसळणे अशा घटना घडल्या आहेत. नवी मुंबईत दुचाकीवर झाड कोसळल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला; तर उल्हासनगरमध्ये एका रिक्षेवर झाड कोसळल्याने दोन प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. पालकम...

मीरा भाईंदर महापालिकेचे पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत झाले स्वयंपूर्ण

Image
                  अवघ्या तीन दिवसांच्या विक्रमी वेळेत उभा केला ऑक्सिजन जनरेशन प्लँट                                   पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे 17 : - अवघ्या तीन दिवसांत उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लँटमुळे मीरा भाईंदर महापालिकेचे पंडित भीमसेन जोशी कोविड रुग्णालय आता स्वयंपूर्ण झाले असल्याचं मत नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. आज श्री. शिंदे यांच्या हस्ते या ऑक्सिजन जनरेशन प्लांटचं लोकार्पण करण्यात आले. ठाण्यातील पार्कींग प्लाझा कोविड केअर सेंटर मध्ये अवघ्या १० दिवसांत ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणाऱ्या   एअर सिप कंपनीनेच यावेळी अवघ्या तीन दिवसांत मीरा- भाईंदर मधील हा प्लांट उभारून तो कार्यान्वित केलेला आहे. या प्लँटद्वारे दररोज १७५ जंबो सिलेंडर क्षमतेचा ऑक्सि...

"ताउत्के" चक्रीवादळाने ठाणे जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू तर पाच जखमी

  ठाणे दि.18 :- "ताउत्के" चक्रीवादळाचा प्रभाव ठाणे जिल्ह्यात सोमवार दि. १७ मे २०२१ रोजी सकाळ पासून जाणवू लागला होता. सर्वत्र सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस असे चित्र दिसत होते.   या दरम्यान चक्रीवादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यात आतापर्यंत   ठाणे तालुक्यात एक जणांचा मृत्यू व   चार जखमी झालेत . मिरा भाईदर मध्ये एक मृत्यू झाला असून . उल्हासनगर मध्ये एका मृत्यूची नोद झाली आहे व एक जखमी झाले आहे. तसेच भिवंडी तालुक्यात   एक घर व अंबरनाथ तालुक्यात   पाच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उपजिल्हाधिकारी   डॉ. शिवाजी पाटील यांनी दिली आहे.