जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे येथे 13 फेब्रुवारी,2026 रोजी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
ठाणे,दि.10(जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्दोजकता मार्गदर्शन केंद्र, ठाणे व लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन, ठाणे यांच्या संयुक्त विद्दमाने दि. 13 फेब्रुवारी,2026
रोजी सकाळी 10-00 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
जुने कोषागार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे
सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांकरिता प्लेसमेंट ड्राईव्ह
आयोजित करण्यात येणार आहे. या
मेळाव्यात एस.एस.सी., एच.एस.सी,
पदवीधर, आय.टी.आय / डिप्लोमा इ. या शैक्षणिक पात्रतेच्या
नोकरीच्या संधी व मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेकरिता तसेच
स्वयंरोजगाराकरिता शासकीय महामंडळाच्या कर्ज योजनाबाबत उमेदवारांसाठी संधी उपलब्ध
आहेत. तरी सर्व नोकरी इच्छूक उमेदवारांनी या प्लेसमेंट
ड्राईव्हचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा
कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त संध्या साळुंखे
यांनी केले आहे.
00000000000
Comments
Post a Comment