नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन 2026’ एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

 



 

ठाणे,दि.10(जिमाका) :- राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएमई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार, स्वयंरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम व निर्यातवृध्दीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना संचालनालयामार्फत राज्यात राबवित आहेत. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संबंधित सर्व विभागांच्या सहकार्याने ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन-2026’ या अंतर्गत जिल्हानिहाय दि.12 फेब्रुवारी 2026 रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येत  आहे. या कार्यशाळेचा उद्देश हा ठाणे जिल्ह्यातील उद्योजकांच्या क्षमता वृध्दी करून उत्पादन जागतिक बाजारात नेणे हा असून या कार्यशाळेत खालील विषयांचे सादरीकरण होणार आहे.

Ø  जिल्ह्यातील सुक्ष्म, लघु व मध्यम घटकांची संभाव्य क्षमता वृध्दी बाबत.

Ø  उद्योग विभागाची विविध धोरणे व योजना.

Ø  मैत्री कायदा व इज ऑफ डुईंग बीजनेस (Ease of Doing Business).

Ø  स्थानिक उत्पादनांची गुणवत्ता वाढविणे.

Ø  निर्यात वृध्दीसाठीच्या विविध संधी.

Ø  खरेदीदर व विक्रेते यांना (Digital) ऑनलाईन सुविधा उपलब्ध करणे.

Ø  निर्यातीसाठी आर्थिक सहारूय आणि अनुदान योजना.

या कार्यशाळेचे SIDBI, IDBI Capital हे मुख्य प्रायोजक आहेत. याशिवाय DGFT, उद्योग विभाग, MAITRI, SIDBI, IDBI, FIEO, CGTMSE, India Post, ONDC, EPC मधील तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे.

या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील औद्योगिक संघटना, निर्यातदार नामांकित उद्योजक, उद्योजक व्यवसायाशी संबंधित सर्व शासकीय विभाग, महिला स्वयंसहाय्यता बचत गटाचे सदस्य निर्यातीशी संबंधित अधिकारी व केंद्र व राज्य शासनाचा अनुदान योजनेचा लाभ घेतलेल्या यशस्वी उद्योजक यांचा सहभाग राहणार आहे.

या कार्यशाळेकरिता जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना, नामांकित उद्योजक, उद्योजक व्यवसायांशी संबंधित सर्व शासकीय विभाग व संस्था यांनी उपस्थित राहावे. ही एक दिवसीय कार्यशाळा दि.12 फेब्रुवारी, 2026 रोजी सकाळी 9.00 वा. ते सायंकाळी 5.00 वा. पर्यंत नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने या कार्यशाळेस मोफत नोंदणीसाठी या कार्यालयाशी संपर्क साधावा (संपर्क क्रं. 8828435077),  असे आवाहन ठाणे जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक सोनाली में. देवरे यांनी केले आहे.

000000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ