ठाणे जिल्ह्यात ‘अरुणोदय सिकलसेल ऍनिमिया विशेष अभियान’ प्रभावीपणे सुरू लाखो नागरिकांची तपासणी पूर्ण

 


ठाणे,दि.11(जिमाका) :- ठाणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ‘अरुणोदय सिकलसेल एनिमिया विशेष अभियान’ दि. 15 जानेवारी पासून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या अभियानाची अंमलचजावणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी           डॉ. गंगाधर परगे यांच्या अधिपत्याखाली करण्यात येत असून, जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये 0 ते 40 वयोगटातील नागरिकांची सिकलसेल तपासणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच व्यापक जनजागृती मोहीमही राबविण्यात येत आहे.

अभियानाची सद्यस्थिती (दि. 15 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2026)

या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागांमध्ये एकूण 1 लाख 45 हजार 392 घरभेटी देण्यात आल्या. घरभेटीदरम्यान 118 सिकलसेल रुग्णांना तसेच 1909 सिकलसेल वाहक व्यक्तींना भेट देऊन आवश्यक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले.

या कालावधीमध्ये आज अखेरपर्यंत 2 लाख 21 हजार 449 एवढ्या व्यक्तींच्या सोल्युबिलिटी तपासण्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये एकूण 15 नवीन सिकलसेल रुग्ण आढळले असून 230 सिकलसेल वाहक आढळून आले आहेत.



कार्ड वितरणाची स्थिती

तपासणी पूर्ण झालेल्या व्यक्तींना पुढीलप्रमाणे कार्ड वितरित करण्यात आले आहे -

Ø  1 लाख 15 हजार व्यक्तींना पाढरे कार्ड.

Ø  230 सिकलसेल वाहक व्यक्तींना पिवळे कार्ड.

Ø  15 सिकलसेल रुग्णांना लाल कार्ड.

सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यामध्ये एकूण 133 सिकलसेल रुग्ण असून 2139 एवढे सिकलसेल वाहक आहेत.

सिकलसेल ऍनिमिया हा एक अनुवांशिक रक्त विकार असून, वेळेवर तपासणी, समुपदेशन व योग्य उपचारांद्वारे त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर टाळता येऊ शकतात. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील 0 ते 40 वयोगटातील सर्व नागरिकांनी सिकलसेल तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी व स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी यांनी कळविले आहे.

000000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ