कोपरी येथे खेळाडूंसाठी विनामूल्य फिटनेस वर्ग अर्जुन पुरस्कार विजेती हिमानी परब व आंतरराष्ट्रीय खेळाडू सुचिता तेंडुलकर यांचे मार्गदर्शन

 

ठाणे, दि.13(जिमाका) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने तालुका क्रीडा संकुल, कोपरी येथे खेळाडूंसाठी विनामूल्य फिटनेस वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमातून लहान वयोगटातील खेळाडूंमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, लवचिकता व सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधण्यावर भर दिला जाणार आहे.

हे फिटनेस वर्ग अर्जुन पुरस्कार विजेती, मल्लखांब खेळाडू व क्रीडा कार्यकारी अधिकारी हिमानी परब आणि आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग खेळाडू व क्रीडा कार्यकारी अधिकारी सुचिता तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहेत.

5 ते 16 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी हे वर्ग आयोजित करण्यात आले असून, सोमवार ते शुक्रवार दरम्यान सायंकाळी 4.00 ते 6.00 या वेळेत तालुका क्रीडा संकुल, कोपरी, ठाणे येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये खेळाडूंची शारीरिक क्षमता वाढविणे, लवचिकता सुधारणा, शक्तिवर्धन तसेच क्रीडा कौशल्य विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक पालकांनी आपल्या पाल्यांची नोंदणी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२५३६८७५५ किंवा dsothane2020@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व खेळाडूंनी आपल्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच क्रीडा क्षेत्रात प्रगती साधावी, असे आवाहन ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

00000000000

 

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ