संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमण धारकांसाठी महत्वाची सूचना
ठाणे,दि.18(जिमाका) : मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्याकडील
जनहित याचिका क्रमांक- 305/1995 मधील दि.07 मे 1997 रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने संजय
गांधी राष्ट्रीय उद्यानातील उर्वरित अतिक्रमणधारकांचे सर्वेक्षण करुन यादी अंतिम करणे
व त्यानुसार पुनर्वसन प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही शासनामार्फत सुरु आहे. मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात
आलेल्या उच्च्चाधिकार समितीमार्फत या प्रक्रियेचे सनियंत्रण करण्यात येत आहे.
उप संचालक (उत्तर), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांच्या
अधिनस्त क्षेत्रातील अतिक्रमण धारकांचे सर्वेक्षण M/s. Grant Thornton Bharat LLP या
अधिकृत एजन्सीमार्फत करण्यात आले असून, या सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या एकूण
3020 अतिक्रमणधारकांची प्राथमिक यादी वनविभागाच्या संकेतस्थळ www.mahaforest.gov.in येथे तसेच संचालक, उप संचालक
(उत्तर) व वनपरिक्षेत्र कार्यालय, येऊर येथील नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येत आहे.
तसेच खालील तक्त्यात नमूद केलेल्या पुनर्वसन कक्षामध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
या प्राथमिक यादीचे पृथक्करण करुन अंतिम पात्रता निश्चितीची कार्यवाही
करण्यात येणार आहे. त्यासाठी मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व शासन
निर्देशानुसार अतिक्रमणधारकांनी खालील दस्तऐवज सादर करणे आवश्यक आहे.
1. दि.01 जानेवारी 1995
च्या मतदान यादीत नाव असल्याबाबत मतदार यादी/पानाची छायांकित प्रत.
2. पुनर्वसन प्रक्रिया अनुषंगाने
यापूर्वी रु.5000/- किंवा 7000/- रक्कम जमा केलेल्या पावतीची छायांकित प्रत.
3. वन विभागामार्फत दिलेली
झोपडी क्रमांक (अतिक्रमित क्षेत्रात वास्तव्याबाबत).
4. दि.01 जानेवारी 1995
ते दि.01 जानेवारी 2011 या दरम्यानच्या मतदान यादीत नाव समाविष्ट असल्याबाबत मतदार
यादी / पानाची छायांकित प्रत.
5. अतिक्रमणधारकांचे ओळखपत्र
मतदान ओळखपत्र.
6. इतर ओळखीचे पुरावे
आधार कार्ड, रेशन कार्ड शिधापत्रिका इत्यादी.
करीता सर्व अतिक्रमणधारकांना सुचित करण्यात येते की, वरीलप्रमाणे
प्रसिध्द केलेल्या प्राथमिक यादीतील अतिक्रमणधारकांनी तसेच ज्यांचे नाव या यादीत समाविष्ट
नाही, परंतू ते वनक्षेत्रात वास्तव्यास आहेत, अशा सर्व अतिक्रमणधारकांना पात्रता निश्चितीच्या
अनुषंगाने वरीलप्रमाणे दस्ताऐवज व सर्वेक्षण माहिती सादर करण्यासाठी ही अंतिम संधी
उपलब्ध करून देण्यात येत आहे.
वरील बाबीची नोंद घेऊन अतिक्रमणधारकांनी आवश्यक दस्तऐवज व सर्वेक्षण
माहिती खाली नमुद केलेल्या ठिकाणी दि.20 फेब्रुवारी 2026 ते दि.28 फेब्रुवारी 2026,
सकाळी 07:30 ते रात्री 9:30 या वेळेत जमा करावेत.
1.
अतिक्रमीत नगर/पाडयाचे नाव - हनुमान नगर, जुनागांव,
कैलासनगर, कोकणीपाडा, करचालोनगर, रामनगर, वारलीपाडा, पाटोणापाडा, देवीचापाडा, वणीचापाडा,
फुफाणे, कावेसर, मानपाडा, कृष्णानगर, उपवन.
दस्तऐवज जमा करण्याचे ठिकाण - मौजे पाचपाखाडी राखीव वन सर्वे क्रमांक 520 येथील संरक्षण कुटी
(हनुमानगर), ता. जि. ठाणे.
2.
अतिक्रमीत नगर/पाडयाचे नाव - कशेळीपाडा, केसरीपाडा, ओवळा पानखंडा, टकारपाडा.
दस्तऐवज जमा करण्याचे ठिकाण - परिमंडळ वनअधिकारी, चेणा यांचे कार्यालय, चेणा, ता. जि. ठाणे.
3.
अतिक्रमीत
नगर/पाडयाचे नाव - साईनाथ सेवा नगर, माशाचापाडा.
दस्तऐवज जमा करण्याचे ठिकाण - परिमंडळ वनअधिकारी, घोडबंदर यांचे कार्यालय, घोडबंदर, ता. जि. ठाणे.
निर्धारित कालावधीत दस्तऐवज सादर केलेल्या अतिक्रमकांचाच पुनर्वसनासाठी
विचार करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे संजय गांधी राष्ट्रीय
उद्यान बोरीवली उप संचालक (उत्तर) येऊर प्रदिप पाटील यांनी कळविले आहे.
0000000000
Comments
Post a Comment