कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातून शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आपल्या पाल्यास शाळेत पाठवू नये

ठाणे,दि.02(जिमाका):- बदलापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्र. 56/2026, दि.25 फेब्रुवारी 2026, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012, कलम 12, 8. तसेच भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) कलम 74, 75, 79 नुसार नोंदविण्यात आला आहे. या गुन्हयातील आरोपी वाहनचालक इसम नामे जयेश काळूराम मुने हा असून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन मोटार बस क्र. MH-05AZ-0754 हे बस संवर्गातील वाहन आहे. या अत्याचाराची घटना नमूद वाहनांमध्ये झाल्याची नोंद एफ.आय.आर. मध्ये करण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यातील जप्त वाहनास मोटार वाहन नियमाप्रमाणे रु.19 हजार 500/- दंडात्मक कारवाई करून वाहनाची नोंदणी निलंबन करण्याकरिता वाहनमालकास कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील आरोपी वाहनचालक यांची अनुज्ञप्ती निलंबित करण्यात आली आहे.

माहे एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत एकूण 730 वाहनांवर स्कुलबस नियमाप्रमाणे कारवाई करून रु.11 लाख 32 हजार 250/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

तरी कोणत्याही खाजगी अथवा अनधिकृत / शालेय परवाना नसलेल्या वाहनातून सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, असे आवाहन कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि.4 एप्रिल रोजी दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील 30 भूप्रमाण केंद्रांचे उद्घाटन