विशेष लेख: भक्ती, शक्ती आणि सेवेचा महासंगम: ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी समागम सोहळा

     नवी मुंबईतील खारघर येथील ओवे मैदानावर २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधून एका ऐतिहासिक आणि भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम न राहता तो सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवी मूल्यांच्या जपणुकीचा एक जागतिक संदेश देणारा महासोहळा ठरला. महाराष्ट्र शासन आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात देश-विदेशातील लाखो भाविकांनी हजेरी लावून भक्ती आणि सेवेच्या या महाकुंभात सहभाग नोंदविला.

      या सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शासनाने आणि प्रशासनाने केलेले सूक्ष्म आणि भव्य नियोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने भाविकांच्या सुविधेसाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. खारघरच्या विस्तीर्ण ओवे मैदानाची क्षमता सुमारे ५ लाख भाविकांची असून, मुख्य मंडपात एका वेळी ८० हजार ते १ लाख भाविक बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती.

      भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी १०० पेक्षा अधिक डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचारी तैनात होते. विशेष म्हणजे, कार्यक्रमस्थळी तात्पुरती वैद्यकीय केंद्रे आणि एक आयसीयू कक्ष उभारण्यासोबतच जवळच्या रुग्णालयांमध्ये ३५० खाटा आणि ७५ आयसीयू खाटा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. आरोग्य शिबिरात फिजिओथेरपी, दंतचिकित्सा, हृदयरोग तपासणी आणि मोफत कॅन्सर स्क्रीनिंग सारख्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

      या नियोजनात विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई शहर जिल्हाधिकारी श्रीमती आंचल सूद गोयल, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजा दयानिधी व गणेश देशमुख, सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अंशुमन श्रीवास्तव व रविंद्र इंगोले यांनी समन्वयाने कार्य केले.

    प्रशासनातील अपर आयुक्त फरोग मुकादम, वैशाली इंदानी-उंटवाल, रवींद्र पवार, माणिक दिवे आणि मिनल कुटे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री.गणेश शेटे, सुनील पवार, उपायुक्त प्रशांत मोहिते,   तिरुपती काकडे, रश्मी नांदेडकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा नवी मुंबई समागम कार्यक्रम समन्वयक रविंद्र राठोड, महेश मेघमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके कार्यरत होती. यामध्ये उपायुक्त डॉ. वैभव विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप, प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, प्रभाग अधिकारी श्री. जितेंद्र मढवी, आरोग्य अधिकारी श्री.अनिल कोकरे, अधीक्षक श्री.भावेश चंदने आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांच्यासह विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी योगदानामुळे हा कार्यक्रम सर्वोच्च उंचीवर पोहोचला.

     कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमस्थळी पायाभूत सुविधा, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, स्वच्छता व आपत्कालीन यंत्रणा आदी बाबींची व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती.

       या नियोजनात विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पनवेल महानगरपालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे, पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदाल, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई शहर जिल्हाधिकारी श्रीमती आंचल सूद गोयल, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक राजा दयानिधी व गणेश देशमुख, सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे आणि भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अंशुमन श्रीवास्तव व रविंद्र इंगोले यांनी समन्वयाने कार्य केले.

    प्रशासनातील अपर आयुक्त फरोग मुकादम, वैशाली इंदानी-उंटवाल, रवींद्र पवार, माणिक दिवे आणि मिनल कुटे, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्री.गणेश शेटे, सुनील पवार, उपायुक्त प्रशांत मोहिते, तिरुपती काकडे, रश्मी नांदेडकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तथा नवी मुंबई समागम कार्यक्रम समन्वयक रविंद्र राठोड, महेश मेघमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके कार्यरत होती. यामध्ये उपायुक्त डॉ. वैभव विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप, प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, प्रभाग अधिकारी श्री. जितेंद्र मढवी, आरोग्य अधिकारी श्री.अनिल कोकरे, अधीक्षक श्री.भावेश चंदने आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.आनंद गोसावी यांच्यासह विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी योगदानामुळे हा कार्यक्रम सर्वोच्च उंचीवर पोहोचला.

     कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमस्थळी पायाभूत सुविधा, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, स्वच्छता व आपत्कालीन यंत्रणा आदी बाबींची व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. जवळपास 26 विविध समित्या स्थापित करण्यात आल्या होत्या आणि या समित्यांमध्ये विविध विभागांचे शासकीय अधिकारी त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे अधिकारी-स्वयंसेवक या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र मेहनत घेत होते.

      नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त प्रशांत मोहिते, तिरुपती काकडे, रश्मी नांदेडकर, संजय पाटील, सचिन गुंजाळ, पंकज डहाणे आणि त्यांच्या सर्व सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुरक्षा, वाहतूक आणि पार्किंग यासाठी केलेले नियोजन व व्यवस्था हे या सोहळ्याच्या यशाचे एक महत्त्वाचे गमक होते. नवी मुंबई पोलीस आणि वाहतूक शाखेने 33 पेक्षा अधिक ठिकाणी पार्किंगची सोय केली होती. भाविकांचा गोंधळ टाळण्यासाठी पार्किंगचे 'ब्लू', 'ऑरेंज' आणि 'पिंक' अशा तीन रंगात वर्गीकरण करण्यात आले होते. ज्या ठिकाणी भाविक आपली वाहने पार्क करतील, तिथून मुख्य कार्यक्रमस्थळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने 150 पेक्षा अधिक विशेष एनएमएमटी बसद्वारे मोफत 'पिकअप आणि ड्रॉप' सेवा उपलब्ध करून दिली होती. सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा, नियंत्रण कक्ष आणि 500 पेक्षा अधिक पोलीस अंमलदारांसोबत सायबर पोलीस व एटीएसचीही मदत घेण्यात आली होती .

    या दरम्यान कोकण विभागाने एक विश्वविक्रम देखील प्रस्थापित केला. सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज सिंग यांनी  गुरु गोविंद सिंग यांच्या जीवनकाळावर आधारित जे गीत गायले ते गीत कोकण विभागातील 20 हजार शैक्षणिक संस्थामध्ये 51 लाख विद्यार्थी आणि 1 लाख 50 हजार शिक्षण कर्मचाऱ्यांनी सहभागातून समूह गान केले, याची  'बेस्ट ऑफ इंडिया' रेकॉर्ड मध्ये विश्व विक्रमाची नोंद झाली. समूहगानाच्या  माध्यमातून विश्व विक्रमाची नोंद झाल्याबद्दल डॉ. परदेशी यांनी कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे व सर्व सहकारी, अधिकारी, सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त फरोग मुकादम, अपर आयुक्त रवींद्र पवार, अपर आयुक्त (विकास) डॉ.माणिक दिवे, सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त (नगर परिषद प्रशासन) डॉ. सागर घोलप, सहायक आयुक्त (विकास) डॉ.प्रदीप घोरपडे, शिक्षण विभागाचे कोकण विभागीय उपसंचालक डॉ.स्वरूप कंकाळ,  कोकण विभागीय प्र.माहिती उपसंचालक मनोज सानप, तहसिलदार गजानन धुमाळ, कोकण महसूल विभागातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, तहसिलदार,  शिक्षणाधिकारी यांच्यासह सर्व जिल्हा माहिती अधिकारी तसेच इतर विविध विभागाचे अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध शैक्षणिक संस्था काटेकोर नियोजन केले होते.

      हिंद दी चादर’ कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, नवी मुंबई आयोजन समितीचे अध्यक्ष अमरपाल सिंघ रंधावा, खारघर गुरुद्वाराचे अध्यक्ष परमजित सिंग बल, महाराष्ट्र राज्य सिख समन्वय समितीचे श्री.चरणदीप सिंग (हॅप्पी सिंघ) आणि पंजाब अकॅडमीचे कार्याध्यक्ष बल मिलकित सिंग, जसपालसिंघ सिद्धू, सुखविंदरसिंघ ढिलॉन, धर्म जागरण मंचचे अखिल भारतीय प्रमुख शरदरावजी ढोले, कोकण प्रांत प्रमुख महेंद्रजी रायचुरा, राजेशजी कुंटे, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांच्यासह शीख, सिकलगर, बंजारा, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन आणि वारकरी संप्रदायातील नऊ समाजांचा यात उत्स्फूर्त सहभाग होता.

      याशिवाय वनमंत्री गणेश नाईक, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, बंदरे विकास मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ,आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, मुंबईच्या महापौर रितू तावडे, पनवेलचे महापौर नितीन पाटील, आदी मान्यवरांनी देखील याप्रसंगी आवर्जून उपस्थिती दर्शविली.

     कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सुमारे एक लाखाच्या जवळपास भाविकांनी लंगर सेवेचा लाभ घेतला. 'सेवा हीच खरी श्रद्धा' या ब्रीदवाक्याला जागून प्रशासनाने आणि स्वयंसेवकांनी लंगरची चोख व्यवस्था ठेवली होती.

       केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लंगरमध्ये संत-महंतांना भोजन वाढून सेवेचा आदर्श घालून दिला.

      सांस्कृतिकदृष्ट्याही हा सोहळा अत्यंत समृद्ध होता. 'विरासत-ए-शीख' प्रदर्शनाद्वारे शीख धर्माचा इतिहास आणि शौर्यगाथा भाविकांसमोर मांडण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ध्वनिचित्रफितीद्वारे आपला संदेश पाठवून गुरुंच्या त्यागाची परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचविणे हीच खरी सेवा असल्याचे नमूद केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरु तेग बहादूर साहिबजींच्या बलिदानाचा उल्लेख 'मानवतेसाठी दिलेली प्रेरणा' असा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी गुरुजींच्या बलिदानाचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची आणि नवी मुंबईत त्यांच्या नावाने भव्य रुग्णालय उभारण्याची मोठी घोषणा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुंच्या कार्याला 'सत्य आणि करुणेची ताकद' संबोधले, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या शिकवणीतील निर्भयतेवर भर दिला.

       लंडन, कॅनडा आणि अमेरिकेतील भाविकांच्या उपस्थितीने हा सोहळा जागतिक स्तरावर गाजला. हा ३५० वा शहीदी समागम सोहळा प्रशासकीय तत्परता आणि सामाजिक समरसतेचा एक संस्मरणीय वस्तुपाठ ठरला, हे निश्चित.

 

मनोज सुमन शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

ठाणे/रायगड

तथा

प्र.उपसंचालक (माहिती),

विभागीय माहिती कार्यालय,

कोकण भवन, बेलापूर,नवी मुंबई.

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि.4 एप्रिल रोजी दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील 30 भूप्रमाण केंद्रांचे उद्घाटन