ठाण्याचे योगतज्ज्ञ डॉ. कुंभार यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान

ठाणे,दि.16(जिमाका): येथील डीएव्ही पब्लिक स्कूलचे योग शिक्षक आणि योगतज्ज्ञ डॉ. अजय कुंभार यांना स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र आणि श्रीलंकेतील भारतीय उच्चायोगाकडून विशेष प्रशंसापत्राने सन्मानित करण्यात आले आहे. श्रीलंकेतील नागरिकांसाठी ऑनलाईन पद्धतीने सन 2020 पासून आयोजित ऑनलाईन योग सत्रांमध्ये डॉ. कुंभार सलगपणे योगदान देत आहेत. त्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.

डॉ. कुंभार यांनी आतापर्यंत नियमित, संरचित आणि शिस्तबद्ध योग कार्यक्रमांद्वारे योग, आरोग्य, मानसिक संतुलन आणि भारतीय सांस्कृतिक मूल्यांना प्रोत्साहन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या सेवांमुळे श्रीलंकेत भारतीय संस्कृती आणि योगाची ओळख केवळ मजबूत झाली नाही तर जागतिक स्तरावर भारताचा हा बहुमोल वारसा स्थापित झाला आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ या भावनेला मूर्त रूप दिले आहे.

डॉ. कुंभार यांनी योग विषयातच पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून, पीएचडीच्या माध्यमातून योगातच त्यांनी संशोधन केले आहे. स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रातर्फे त्यांचा झालेला सन्मान हा त्यांच्या योगातील योगदाचा गौरव आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दि.4 एप्रिल रोजी दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील 30 भूप्रमाण केंद्रांचे उद्घाटन