कोव्हीड संशयित रूग्णांस दाखल करण्यास नकार देणाऱ्या खासगी रूग्णालयांवर होणार कायदेशीर कारवाई – महापालिका आयुक्त
ठाणे दि . 30:- शहरातील नॅान कोव्हीड खासगी रूग्णालयांमध्ये कोव्हीड संशयित रूग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या खासगी रूग्णालयांवर कायदेशीर कारवाई करण्याचा तसेच रूग्णालयाच्या संचालकांविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा इशारा महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिला आहे . कोणतेही रूग्णालय रूग्णांस उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार देवू शकत नाही असे राज्य शासनाचे निर्देश आहेत . त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी कोव्हीड संशयित सिमटोमॅटीक रूग्णांना खासगी नॅान कोव्हीड रूग्णालयात दाखल करून घेणेबाबतचा आदेश नुकताच जारी केला आहे . या आदेशानुसार शहरातील नॅान कोव्हीड रूग्णालयांनी कोव्हीड संशयित रूग्ण दाखल झाल्यास त्याच्या प्रकृती स्वाथ्यानुसार आणि रूग्णालयात दाखल करून घेण्याची आवश्यकता असल्यास आयसोलेशन वॅार्डमध्ये दाखल करून घ्यावे . सदर रूग्णावर उपचार करून त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतर आश्यकता वाटली तर त्याचे स्वॅब कोरोना कोव्हीड तप...