Posts

Showing posts from February, 2026

"हिंद दी चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त भव्य नगर कीर्तन

Image
सीबीडी बेलापूर ते ओवे मैदानापर्यंतचा परिसर भक्तीमय वातावरणात निघाला न्हावून   ' बोले सो निहाल ' च्या जयघोषाने दुमदुमले खारघर        नवी मुंबई , दि. 27( विमाका): ' हिंद-दी-चादर ' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या महान शहिदी समागम सोहळ्यानिमित्त खारघर नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. ' बोले सो निहाल... सत श्री अकाल ' चा गगनभेदी जयघोष आणि या सोहळ्यात संत , भाविक , लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचा ओसंडून वाहणारा उत्साह... अशा पवित्र आणि मंगलमय वातावरणात आज भव्य ' नगर कीर्तन ' सोहळा पार पडला.       या ऐतिहासिक नगर कीर्तनाला आज (दि. 27) सायंकाळी 5.00 वाजता गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा , सीबीडी बेलापूर येथून प्रारंभ झाला. यानंतर डी.वाय.पाटील चौक बेलापूर , आरबीआय कॉलनी चौक , बेलपाडा मेट्रो , खारघर रेल्वे स्टेशन चौक , उत्सव चौक , ग्राम विकास चौक , गुरुद्वारा श्री गुरुसिंह सभा , खारघर येथून समागम स्थळ ओवे खारघर येथे या नगर किर्तनाचा समारोप करण्यात आला. हे किर्तन केवळ एक शोभा यात्रा नाही तर गुरुसाहे...

आगामी जनगणनेसाठी ठाणे प्रशासन सज्ज; तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ

ठाणे , दि. 26( जिमाका): ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन समिती सभागृहात दि. 26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी ठाणे व आयुक्त , ठाणे महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रातील जनगणना  कार्यासाठी नियुक्त चार्ज अधिकारी , जनगणना लिपिक व तांत्रिक सहाय्यक यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ संपन्न झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश आगामी जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यातील (घरयादी व घरगणना) प्रक्रियेची अचूक , पारदर्शक व वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा आहे.    प्रशिक्षणामध्ये जनगणना संदर्भातील नियमावली , माहिती संकलन पद्धती , CMMS Portal,  डिजिटल अँप्लिकेशनचा वापर , डेटा पडताळणी प्रक्रिया तसेच क्षेत्रीय पातळीवरील समन्वय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण सत्रांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रात्यक्षिके व शंका समाधान सत्रांचे आयोजन करण्यात आले असून , सहभागी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामकाजासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय बाबींवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणास...

आता गंभीर आजारांवर घरपोच 'उपशामक काळजी' (Palliative Care)

ठाणे , दि. 26( जिमाका):- राज्यात वाढते कर्करोग , हृदयरोग आणि वृद्धापकाळाशी संबंधित आजार लक्षात घेऊन , महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ' राज्य पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रमा ' ची ( State Palliative Care Programme) व्याप्ती वाढविण्याचा आणि तो अधिक सक्षम करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता केवळ रुग्णालयातच नव्हे , तर ' आरोग्यवर्धिनी केंद्रां ' च्या माध्यमातून गावागावात आणि रुग्णांच्या घरी जाऊन उपशामक सेवा पुरविली जाणार आहे. ' पॅलिएटिव्ह केअर ' म्हणजे काय ? अनेकदा ' पॅलिएटिव्ह केअर ' म्हणजे केवळ आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यातील सेवा असा समज असतो. मात्र , शासनाच्या नवीन निर्णयानुसार , आता आजाराचे निदान झाल्यापासून उपचारांच्या संपूर्ण कालावधीत रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना शारीरिक , मानसिक , सामाजिक व आध्यात्मिक आधार दिला जाईल. याचा उद्देश रुग्णाचे जीवन सुसह्य करणे आणि वेदना कमी करणे हा आहे. कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये: 1. घरोघरी आरोग्य सेवा ( Home-based Care) : समुदाय आरोग्य अधिकारी ( CHO), ए.एन.एम. ( ANM) ...

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2025-26 इ.8 वी साठी परीक्षा दिनांक 28 डिसेंबर 2025 गुणयादीबाबत

ठाणे , दि.24(जिमाका):- सन 2007-08 पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा ( NMMS) ही मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना , तसेच त्यांचे 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. ही शिष्यवृत्ती 12 वी पर्यंत मिळते. सन 2017-18 पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु.1,000/- (वार्षिक रु.12,000/-) आहे. इ.8 वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उपन्न रु.3,50,000/- पेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे या शिष्यवृत्तीचे वाटप होते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद , पुणे यांच्यामार्फत दि.28 डिसेंबर , 2025 रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्याांसाठी शिष्यवृत्ती योजना ( NMMS) परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या www.mscepune...

दशावतार नाट्य महोत्सवाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई कडून आयोजन

सचिन तेंडुलकर स्टेडियम , महात्मा फुले नगर ठाणे येथे 05 दिवसीय दशावतार नाट्य महोत्सव आयोजन   ठाणे , दि.24(जिमाका):- महाराष्ट्र दशावतार लोककला ही कोकणाच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे दशावतार लोककला ही कोकणाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख लोककला आहे. ही कला भगवान विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित आहे आणि ती पौराणिक कथांवर आधारित नाटके सादर केली जातात. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांच्या वतीने ‘दशावतार नाट्य महोत्सव या भव्य कार्यक्रमाचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार , दि.25 फेब्रुवारी 2026 ते 1 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता , सचिन तेंडुलकर स्टेडियम , महात्मा फुले नगर , सावरकर जगर , ठाणे   येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा दशावतार महोत्सव पार पडणार आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील विविध दशावतार मंडळांचे सादरीकरण करणारे 100 हून अधिक कलाकार एकाच मंचावर य...

महाज्योतीचे सर्व प्रशिक्षण कार्यक्रम वेळेत होत असून ऑनलाईन प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची मागणी !!

ठाणे दि.24 (जिमाका):- महाज्योतीकडून एकूण 11 प्रकारचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतात. त्यापैकी संघ लोकसेवा आयोग ( UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC) चे राज्यसेवा व संयुक्त गट ब व क तसेच मिलिटरी भरती प्रशिक्षण या स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात देण्यात येत आहे. त्यातील संघ लोकसेवा आयोग ( UPSC) प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमाह रुपये 13 हजार विद्यावेतन , एकवेळ रुपये 18 हजार आकस्मिक निधी प्रदान करण्यात येतो. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग ( MPSC) चे राज्यसेवा व संयुक्त गट ब व क तसेच मिलिटरी भरती प्रशिक्षण या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रतिमाह रुपये 10 हजार विद्यावेतन , एकवेळ रुपये 12 हजार आकस्मिक निधी प्रदान करण्यात येतो. त्यामुळे या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नसून विद्यावेतन , आकस्मिक निधी नियमित चालू राहणार आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा प्रशिक्षणातून 298 , कर्मचारी निवड आयोग प्रशिक्षणात 499 , मिलिटरी भरती प्रशिक्षणात 1500 , MBA CAT/CMAT-CET प्रशिक्षण...