दशावतार नाट्य महोत्सवाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई कडून आयोजन

सचिन तेंडुलकर स्टेडियम, महात्मा फुले नगर ठाणे येथे

05 दिवसीय दशावतार नाट्य महोत्सव आयोजन

 

ठाणे,दि.24(जिमाका):- महाराष्ट्र दशावतार लोककला ही कोकणाच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे दशावतार लोककला ही कोकणाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख लोककला आहे. ही कला भगवान विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित आहे आणि ती पौराणिक कथांवर आधारित नाटके सादर केली जातात. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘दशावतार नाट्य महोत्सव या भव्य कार्यक्रमाचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले आहे. हा सोहळा बुधवार, दि.25 फेब्रुवारी 2026 ते 1 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता, सचिन तेंडुलकर स्टेडियम, महात्मा फुले नगर, सावरकर जगर, ठाणे  येथे होणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा दशावतार महोत्सव पार पडणार आहे.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील विविध दशावतार मंडळांचे सादरीकरण करणारे 100 हून अधिक कलाकार एकाच मंचावर येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, अमृतनाथ पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ, खानोलकर पारंपरिक दशावतार मंडळ, खानोली  आणि सिध्दीविनायक दशावतार नाट्य मंडळ, डोंबिवली यांसारख्या पारंपरिक लोककलांचे जिवंत दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे.

महाराष्ट्राची लोकसंस्कृती जतन करणे आणि या दुर्मिळ होत चाललेल्या लोककलांना ऊर्जितावस्था देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक  श्रीराम पांडे यांनी केलेले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन