ठाण्यात 15 एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी 'विभागीय कार्यशाळेचे' आयोजन
ठाणे,दि.14(जिमाका) : तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण
करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे पुढाकार
घेण्यात आला आहे. प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण, मुंबई विभाग) आणि सहाय्यक आयुक्त
(समाज कल्याण, ठाणे) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि.१५ एप्रिल रोजी ठाण्यात एका विशेष विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ.काशिनाथ
घाणेकर नाट्यगृह येथे सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत समाज कल्याण विभाग, मुंबई व ठाणे आणि विभागीय तृतीयपंथी मंडळ, कोकण विभाग यांच्या
संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शासनाच्या
निर्देशानुसार प्रत्येक विभागात आणि जिल्ह्यात तृतीयपंथीयांच्या तक्रार निवारणासाठी
समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून तक्रार निवारण: तृतीयपंथीयांच्या
तक्रारींचे जलद आणि प्रभावी निवारण करणे, कायदेशीर मार्गदर्शन: त्यांना त्यांच्या अधिकारांसंदर्भात
कायदेशीर माहिती देणे, ओळखपत्र वाटप: तृतीयपंथीयांना त्यांची अधिकृत ओळखपत्रे मिळवून
देण्यासाठी प्रक्रिया राबविणे, सर्वांगीण विकास: त्यांच्या समस्यांचा सखोल अभ्यास करून
त्यावर उपाययोजना सुचविणे, या गोष्टींवर भर दिला जाणार आहे:
या
एकदिवसीय कार्यशाळेत केवळ मार्गदर्शनच नाही, तर सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक प्रबोधनपर
कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
सहाय्यक
आयुक्त (समाज कल्याण, ठाणे) समाधान इंगळे यांनी
ठाणे जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन या
संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
00000000
Comments
Post a Comment