अमृत परिवार सर्वेक्षण अभियान, 2026 अमृतच्या लक्षित गटाचे परिवार सर्वेक्षण
ठाणे, दि.7(जिमाका) :- महाराष्ट्र संशोधन, उन्नती
व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजे अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. खुल्या
प्रवर्गातील अशा जाती ज्यांना इतर कुठल्याही संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा
लाभ नाही, अशा जातीतील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ
घेता येतो. अमृतच्या लक्षित गटात सद्यस्थितीमध्ये ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी,
गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार,
नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी,
कोमटी/वैश्य इत्यादि जातींचा समावेश आहे. अमृतच्या विविध योजना कुटुंबातील प्रत्येक
घटक जसे विद्यार्थी, तरुण, महिला, व्यावसायिक, शेतकरी यांच्यासाठी आहेत. या योजना लक्षित
गटातील जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत पोहचाव्या यासाठी अमृत संस्थेकडून संपूर्ण महाराष्ट्रात
या लक्षित गटातील कुटुंबांचे परिवार सर्वेक्षण केले जाणार आहे.
अमृत
परिवार सर्वेक्षण अभियान दि.8 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 दरम्यान ठाणे जिल्ह्यात सुद्धा
राबविले जाणार आहे. या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्षित गटाशी संपर्क करणार
आहेत. लक्षित गटातील विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळे यांच्याकडून सुद्धा समाजाची
माहिती घेतली जाणार आहे. वरील जातीत असणाऱ्या कुटुंबातील व्यक्ती, संस्था, संघटना,
मंडळे या कालावधीत अमृतच्या प्रतिनिधींशी संपर्क करून आपल्या परिवाराची, समाजाची माहिती
देऊ शकता व अमृतच्या सध्याच्या चालू असलेल्या विविध योजनांची माहिती घेवू शकता. यासाठी
9112226533 हा संपर्क क्रमांक असून संकेतस्थळ
https://mahaamrut
आहे.
तरी
लक्षित गटातील जास्तीत जास्त व्यक्तींनी अमृत कडे आपल्या परिवाराची नोंदणी करून याचा
लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतच्या जिल्हा व्यवस्थापक माया रत्न पारखी-खेत्रे यांनी केले
आहे.
00000000
Comments
Post a Comment